बापरे! बँकांना चूना लावून चार वर्षात इतके आरोपी देश सोडून पळाले - Maharashtra Mazaa

Latest

Monday, September 14, 2020

बापरे! बँकांना चूना लावून चार वर्षात इतके आरोपी देश सोडून पळाले

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली: देशातील सर्वश्रेष्ठ तपास पथक म्हणून ओळख असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयद्वारे जितक्या बँक आर्थिक गैरव्यवहाराचा तपास केला जात आहे, त्या सर्व  प्रकरणांमध्ये 2015 पासून 38 आरोपी हे आतापर्यंत देश सोडून फरार झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे खासदार डीन कुरियाकोसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली. अनुराग ठाकूर यांनी सीबीआयच्या हवाले दिलेल्या माहितीनुसार,  बँकांसंबधी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमधील 38 लोक हे 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान देश सोडून पळाले आहेत. 

'समलिंगी विवाह आपल्या संस्कृतीचा भाग नाही', केंद्राने न्यायालयात मांडली भूमिका

ते पुढे म्हणाले की, सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) 20 लोकांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी इंटरपोलकडे सुद्धा गेलेले आहे. 14 लोकांच्या विरोधात वेगवेगळ्या देशांत एक्स्ट्रॅडीक्शन म्हणजे आरोपीला त्याच्या देशाच्या स्वाधीन करण्याची विंनती केली गेली आहे. तसेच Fugitive Economic Offenders Act, 2018 नुसार 11 लोकांविरोधात कारवाई केली जात आहे. पण सरकारने मात्र अजून हे स्पष्ट केलेले नाहीये की, या आरोपींवर किती मोठा गुन्हा दाखल आहे अथवा त्यांनी किती मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारने याआधी 4 जानेवारी 2019 ला सक्तवसुली संचलनालयाच्या हवाल्याने संसदेत स्पष्ट केलं होतं की, गेल्या पाच वर्षात 27 बँक आर्थिक घोटाळ्याचे आरोपी हे देश सोडून पळाले होते. तत्कालीन अर्थराज्यमंत्र्यांनी संसदेत सांगितलं होतं की सक्तवसुली संचलनालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच वर्षात आणि चालू वर्षात आर्थिक घोटाळे करुन कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी हे आरोपी कोणत्यातरी दुसऱ्या देशात पळून गेले आहेत. त्यांची संख्या 27 आहे. आणि आता गेल्या दिड वर्षात हा आकडा 27 वरुन 38 वर पोहोचला आहे. 



from News Story Feeds https://ift.tt/2E1GRff
via IFTTT

No comments:

Post a Comment