"कंगनाच्या सुरक्षेसाठी मोदी सरकार 10 लाखांचा खर्च का करतंय?" - Maharashtra Mazaa

Latest

Monday, September 14, 2020

"कंगनाच्या सुरक्षेसाठी मोदी सरकार 10 लाखांचा खर्च का करतंय?"

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली : वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आलेली राष्ट्रीय पुरस्कार विजेती बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला केंद्रीय गृहमंत्रालयाने Y दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. कंगनाच्या या सुरक्षेवर सर्वोच्च न्यायालयातील वकील ब्रिजेश कलाप्पा यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कंगना आता सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचली आहे. त्यामुळे आता तिची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आल्याने एका व्यक्तीसाठी १० लाखांचा खर्च येतो. हा पैसा करदात्यांकडून घेतला जातो. कंगना आता हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या घरी सुरक्षितपणे पोहोचली आहे. त्यामुळे मोदी सरकार आता तिला देण्यात आलेली सुरक्षा काढून घेणार का?, असं कलाप्पा म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. 

भांडखोर चीनची गुर्मी झाली कमी; म्हणतो, 'भारताला आम्ही शत्रू मानत नाही...

कंगनाने कलाप्पा यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ब्रिजेशची सुरक्षा तुमच्या किंवा माझ्या म्हणण्यामुळे दिली जात नाही. इडीला ( Intelligence Bureau) जर त्यांच्या तपासात काही धोका असल्याचं वाटलं, तर त्यानुसार एखाद्याला सुरक्षा देण्याचं ठरवल जातं. देवाची कृपा असेल तर लवकरच माझी सुरक्षा काढून टाकण्यात येईल किंवा परिस्थिती गंभीर बनत असेल तर सुरक्षा वाढवलीही जाऊ शकते, असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

कंगनाने मुंबई सोडल्यानंतरही ट्विट केलं होतं. चंदीगडमध्ये पोहोचल्यानंतर माझी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. लोक माझे अभिनंदन करत आहेत. यावेळी मी वाचले असं मला वाटतं. मी मुंबईतून सुखरुप परत येईन असं मला वाटलं नव्हतं, असं ती म्हणाली होती. 

"अंतिम' परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची डमी चाचणी ! "एवढ्या'...

दरम्यान, कंगनाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिरसोबत केल्याने तिच्याविरोधात राज्यातील अनेक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधानही केले होते. संजय राऊत आणि कंगना यांच्यातही ट्विटरवर वॉर रंगले. त्यानंतर कंगनाने मुंबई कोणाच्या बापाची नाही, अशा शब्दांत तिच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांबाबत ट्विटरच्या माध्यमातून सुनावले होते. यापार्श्वभूमीवर कंगनाला गृहमंत्रालयाने देशातील व्हीआयपी व्यक्तींना पुरवण्यात येणारी तिसऱ्या क्रमांची सुरक्षा पुरवली आहे. कंगनाने याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले होते. 

काय आहे Y सुरक्षा 
-देशातील  तिसऱ्या क्रमांची सुरक्षा
- यात दोन कमांडोसह 11 जवानांचा समावेश
 - यात दोन अधिकाऱ्यांचा समावेश असतो 



from News Story Feeds https://ift.tt/2RoM6Zz
via IFTTT

No comments:

Post a Comment