देशात कोरोनाचा कहर; पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं सावध - Maharashtra Mazaa

Latest

Saturday, September 12, 2020

देशात कोरोनाचा कहर; पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं सावध

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली- कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निष्काळजीपणा न दाखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लोकांना पूर्ण सावधानता बाळगण्यास सांगितलं आहे. जोपर्यंत कोरोना विषाणूवर उपचार मिळत नाही, तोपर्यंत निष्काळजीपणा न करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. 

नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत मध्य प्रदेशमध्ये 12,000 गावात निर्मित 1.75 लाख घरांचे लोकार्पण केले. या योजनेमुळे 1.75 लाख कुटुंबांचा गृह प्रवेश शक्य झाला. याप्रसंगी व्हीडिओ परिषदेच्या माध्यमातून त्यांनी लाभार्थींसोबत संवाद साधला. यावेळी कोरोनापासून वाचण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, जोपर्यंत औषध मिळत नाही, तोपर्यंत कोणताही निष्काळजीपणा करु नका, एकमेकांमधील अंतर दोन मिटरचे ठेवा आणि मास्क नक्की वापरा.

जपानसोबतच्या 'डील'चा भारताला चीनविरोधात होणार फायदा

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून मागील 24 तासांत देशात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 97,570 नवे रुग्ण सापडले आहेत. एका दिवसांत आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. भारतासहीत जगभरातील 180 हून अधिक देशांना कोरोना विषाणूचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत जगात 2.81 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत 9.09 लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने  शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधितांची संख्या ही 46 लाख 59 हजार 984 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 1 हजार 201 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यंत 36 लाख 24 हजार 196 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशभरात एकूण 77 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या साऱ्या परिस्थितीत सकारात्मक बाब अशी की, गेल्या 24 तासांत सर्वाधिक म्हणजेच 81, 533 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात 9 लाख 58 हजार 396 इतके लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  देशातील कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट हा 77.77 वर गेला आहे. मागील रिकव्हरी रेटचा विचार करता त्यात फारसा फरक पडलेला नाहीय.
 
लष्करात जवान आणि अधिकाऱ्यांच्या जेवणात दुजाभाव का? राहुल गांधींचा सवाल

जगभरात कोरोनाचे अक्षरश: थैमान घातले आहे. अमेरिकत सर्वाधिक कोरोनाबाधित असून 65 लाखांच्या जवळ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. भारत कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावित दुसरा देश असून ब्राझीलचा क्रमांक दुसरा लागतो. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांच्या पुढे गेली आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 43 लाखांच्या जवळ आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने एकूण कोरोनाग्रस्त संख्येच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकले होते. देशातील रुग्ण वाढीचा दर कामय राहिल्यास भारत लवकरच अमेरिकेला मागे टाकण्याची शक्यता आहे.  

 



from News Story Feeds https://ift.tt/35tmtyK
via IFTTT

No comments:

Post a Comment