ओटावा- जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना उत्तर अमेरिकेतील कॅनाडामधून एक दिलासादायक बातमी आली आहे. कॅनाडामध्ये गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मार्च नंतर पहिल्यांदाच कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. देशाच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोना उद्रेक झाल्यापासून देशात आतापर्यंत 9,163 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 10 सप्टेंबर रोजी कॅनाडामध्ये 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. त्यामुळे देश आता कोरोना महामारीतून सावरताना दिसत आहे. शुक्रवारी देशात नव्या 702 कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कॅनाडामध्ये 1,35,636 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाग्रस्तांचा उच्चांक; 24 तासांत आढळले इतके नवे रुग्ण
कोरोना हातपाय पसरु लागल्याने देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता देशाने बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळवले असल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. शिवाय हळूहळू जनजीवन सुरळीत होत असून देशातील शाळाही पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. असे असले तरी कोरोनाची पुन्हा लाट येऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
कॅनाडाच्या दक्षिणेला अमेरिका देश आहे. शेजारी राष्ट्र अमेरिकेशी तुलना करता कॅनाडाची स्थिती बरी आहे. अमेरिका कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 64 लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख 90 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे.
कॅनाडाला सार्स रोग हाताळण्याचा अनुभव आहे. 2003 ते 2004 च्या काळात कॅनाडामध्ये सार्समुळे 44 लोकांचा मृत्यू झाला होता. आशिया बाहेर सार्समुळे मृत्यूची नोंद होणार कॅनाडा एकमेव देश ठरला होता. त्यामुळे कोरोना महामारीला हाताळण्यासाठी कॅनाडाला तेव्हाचा अनुभव कामी आला आणि देशाने यासारख्या साथीच्या रोगाची चांगली तयारी केली होती.
लष्करात जवान आणि अधिकाऱ्यांच्या जेवणात दुजाभाव का? राहुल गांधींचा सवाल
कॅनाडामध्ये पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण टोरँटोमध्ये 25 जानेवारीला सापडला होता. त्यानंतर पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद 9 मार्च रोजी झाली. सुरुवातीच्या काळात देशात कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार झाले होते. मात्र, योग्य नियोजनाद्वारे देशाने विषाणूच्या प्रादुर्भावाला कमी करण्याचा प्रयत्न केला. मार्च महिन्यामध्ये कॅनाडाने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा परदेशी नागरिकांसाठी बंद केल्या होत्या. तसेच नागरिकांसाठी विमानतळावरच विलगीकरण करण्यात येत होते. कॅनडाची लोकसंख्या 3.76 कोटी आहे.
(edited by- kartik pujari)
from News Story Feeds https://ift.tt/2RkO7FW
via IFTTT


No comments:
Post a Comment