वॉशिंग्टन- इस्त्राईलसोबत झालेल्या ऐतिहासिक शांती करारावर आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि बहारिनने स्वाक्षरी केली. वॉशिंग्टन स्थित व्हाईट हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची घोषणा केली. या करारामागे ट्रम्प यांचा मुत्सद्दीपणा असल्याचं म्हटलं जातंय. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
इस्त्राईल, संयुक्त अरब अमिराती आणि बहारिन आता एकमेकांच्या देशात आपला दुतावास ठेवू शकतील आणि एकमेकांसोबत काम करु शकतील. या करारामुळे सिद्ध झालंय की, देश भूतकाळातील पूर्वग्रह तोडत आहेत. आज देशांनी स्वाक्षरी करुन इतिहास रचलाय, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
These agreements prove that the nations of the region are breaking free from the failed approaches of the past. Today's signing sets history on a new course: US President Donald Trump https://t.co/uhAsQN4nZW
— ANI (@ANI) September 15, 2020
from News Story Feeds https://ift.tt/3hDVnrc
via IFTTT


No comments:
Post a Comment