फेक फोटो शेअर केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या नेत्याला अटक - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, September 13, 2020

फेक फोटो शेअर केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या नेत्याला अटक

https://ift.tt/eA8V8J

आसनसोल: पश्चिम बंगालमधील राजकारण विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगलच तीव्र झाल्याचं दिसतंय. येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे ( BJYM-बीजेवायएम ) प्रदेश सचिव बाप्पा चटर्जी यांच्या झालेल्या अटकेनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी बीजेवायएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सौमित्र खान यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्त्यांनाही अटक केली होती. त्यानंतर त्यांना लगेच सोडण्यात आलं आहे.

शनिवारी बाप्पा चटर्जी यांना आसनसोल येथील कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आसनसोल महानगरपालिकेच्या साइनबोर्डचा बनावट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल चटर्जी यांना अटक करण्यात आली आहे.

देशात कोरोनाचा कहर होत असताना एक दिलासादायक बातमी इथं क्लिक करा

पोलिस आयुक्तालयाबाहेर आंदोलन-
बाप्पा चटर्जी यांच्या अटकेनंतर भाजपा खासदार आणि बीजेवायएम पश्चिम बंगालचे अध्यक्ष सौमित्र खान यांनी चटर्जींच्या अटकेचा निषेध केला. सौमित्र खान यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आसनसोल दुर्गापूर पोलिस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शनिवारी आसनसोल पोलिसांनी सौमित्र खान आणि त्यांच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं पण त्यांना नंतर त्याला सोडण्यात आलं.

सौमित्रा खान यांच्यासह 35 बीजेवायएम कार्यकर्त्यांना अटक-
शनिवारी सकाळपर्यंत खासदार सौमित्र खान आणि त्यांचे कार्यकर्ते बाप्पा चटर्जी यांच्या अटकेचा निषेध करत होते. यानंतर सौमित्र खान यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर 35 युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सौमित्रा खान यांच्या अटकेचा निषेध केला होता, त्यानंतर त्यांनाही सिलीगुडी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

दिल्ली दंगलीप्रकरणी नवीन चार्जशिट दाखल..  वाचण्यासाठी क्लिक करा

बंगालमध्ये भाजपने केली होती रॅली-
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालमधील राजकारणाला चांगलाच रंग चढताना दिसतोय. काही दिवसांपुर्वी भाजपाने बंगालमध्ये एक रॅली आयोजित केली होती ज्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले होते की, कोरोना बंगालमधून संपला आहे परंतु ममता बॅनर्जी भाजपाला सभा घेता येऊ नये म्हणून मुद्दाम लॉकडाऊन जाहीर करत आहे. 

पोलिसांनी राजीनामा देऊन भाजीपाला विकला पाहिजे - दिलीप घोष
शनिवारी पोलिस प्रशासनावर हल्ला चढवत घोष यांनी आरोप केला आहे की, राज्यातील पोलिसांमध्ये भ्रष्ट तृणमूल सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याची हिम्मत नाही. उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील बेलाघारिया भागात 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात घोष बोलत होते. याठिकाणी घोष म्हणाले की, राज्यातील भ्रष्टाचारी पोलिस निर्लज्ज आहेत. तृणमूलचे कार्यकर्त्यांसारखे काम करण्याऐवजी त्यांनी राजीनामा देऊन भाजीपाला विकून निष्ठेनं जगायला हवं. 
 



from News Story Feeds https://ift.tt/3hySNmx
via IFTTT

No comments:

Post a Comment