पुणे - कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने पुणे महापालिकेलाही आर्थिक संकटात ढकलले आहे. वर्षभरात साडेसात हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवलेल्या पालिकेच्या तिजोरीत आजघडीला 150 कोटी रुपयेही उरले नाहीत. जिथे महिन्याकाठचा खर्चच 250-300 कोटी रुपये आहे; तिथे निम्मेच पैसे राहिल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारापासून कोरोनावरील शेकडो कोटींच्या खर्चाचे गणित सोडवायचे कसे?, याची चिंता पालिकेतील कारभारी अन प्रशासनाला भेडसावू लागली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणेकरांच्या आरोग्यापासून विकास कामांना एक पैसाही कमी पडणार नसल्याचे महापालिकेतील सत्ताधारी सांगत आहेत. तर अत्यावश्यक कामे सोडून एक पैसाही कुठे खर्च होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत. शहरातील विकासकामांसह महसुली खर्चावरील ताळेबंद करीत महापालिकेने यंदा सुमारे साडेसात हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर प्रत्यक्षात सात हजार कोटींचे उत्पन्न मिळेल, अशी आशा सत्ताधाऱ्यांना आहे. त्या बळावर तेवढ्याच रकमेच्या योजना आखल्या. परंतु, कोरोना आणि लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसल्याने पहिल्या सहा महिन्यांत अंदाजाच्या जेमतेम 25 टक्के उत्पन्न मिळाले असून, त्यातील 95 टक्के रक्कम खर्च झाली आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पहिल्यांदाच उत्पन्न घसरले
पुणे महापालिकेच्या पहिल्या सहा महिन्यांत साधारपणे 3 हजार ते 3 हजार 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. गेल्यावर्षी म्हणजे, 2019-20 या आर्थिक वर्षात 2 हजार 800 कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर आर्थिक वर्षाअखेरीला हा आकडा पावणेपाच हजार कोटींच्या घरात पोचला होता. तरीही अडीच हजार कोटींची तूट होती. परंतु, यंदा पहिल्या सहा महिन्यांतील उत्पन्नाच्या आकड्यांनी नीचांक गाठल्याचे दिसून येत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पगार करायचा की उपाययोजना ?
महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला 100 कोटी रुपये राखून ठेवावे लागतात. त्याशिवाय, काही अत्यावश्यक बाबींवरही तेवढाच खर्च होतो. त्यात यंदा कोरोनाची भर पडली असून, त्यासाठी महिन्याला किमान 50 ते 60 कोटी रुपये खर्च करावे लागत आहे. या तीन बाबींवरील खर्चाचे आकडे आणि तिजोरीतील रकमेत निम्मी तफावत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार करायचा की कोरोनावरील उपायांना प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च
1 हजार 692 कोटी 16 लाख
पहिल्या सहा महिन्यांतील जमा उत्पन्न
------------------------
976 कोटी 13 लाख
महसुली खर्च
------------------------
572 कोटी
भांडवली खर्च
---------------------------
1 हजार 548 कोटी
एकूण खर्च
----------------------------
144 कोटी 2 लाख
शिल्लक रक्कम
असे मिळाले उत्पन्न
1 हजार 692 कोटी (ऑगस्टअखेर)
एकूण उत्पन्न
------------------------
745 कोटी
राज्य सरकारचे अनुदान (जीएसटी)
--------------------------
798 कोटी
मिळकतकर
------------------------
50 कोटी
बांधकाम
-------------------------
33 कोटी
मालमत्ता व व्यवस्थापन
----------------------------
इतर खाते
66 कोटी
------------------------------
महापालिकेच्या उत्पन्नातील शिल्लक रक्कम कमी आहे; मात्र पुणेकरांना अत्यावश्यक सेवा कमी पडणार नाहीत. त्यासाठी थेट उत्पन्न मिळेल, अशा उपाययोजना आहेत. ज्यामुळे उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. परंतु, काही कामे करताना खर्चाचा विचार केला जाईल.
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका
from News Story Feeds https://ift.tt/2E3Gj8w
via IFTTT


No comments:
Post a Comment