टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंबे आबे हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिंजो आबे हे आजारी असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यामुळेच शिंजो आबे पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिंजो आबे लवकरच याची औपचारिक घोषणा करतील असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. एका आठवड्यात त्यांना दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
जपानमधील सत्ताधारी पक्षाने म्हटलं आहे की, शिंजो आबे यांची प्रकृती ठीक आहे. मात्र त्यांना सातत्याने रुग्णालयात जावं लागत असल्यानं प्रकृतीबाबत अफवा पसरल्या आहेत. आता ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्यावेळी रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिंजो आबे जवळपास 7 तास रुग्णालयात होते. सध्या 65 वर्षांचे असलेल्या शिंजो आबे यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 2021 पर्यंत आहे.
Japanese Prime Minister Shinzo Abe (File Pic) is set to resign, says local media, adding that he wanted to avoid causing problems to the government due to a worsening of his chronic health condition: Reuters pic.twitter.com/YazCU2m78j
— ANI (@ANI) August 28, 2020
हे वाचा - शांतता प्रमुखांना इम्रान यांचे आमंत्रण; अफगाण शांततेला चालना देण्याचा हेतू
गेल्या सोमवारी शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाची 8 वर्षे पूर्ण केली. शिंजो आबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहणारे पंतप्रधान ठरले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरसची परिस्थिती नीट न हाताळल्यानं त्यांची लोकप्रियता कमी झाली होती. त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झाले आहेत. तसंच शिंजो आबे यांनी देशाची अर्थव्यवस्था पुन्हा पुर्वपदावर आणण्याचं आश्वासन दिलं होतं.
from News Story Feeds https://ift.tt/3bbtoxC
via IFTTT


No comments:
Post a Comment