२५ जानेवारीला तैवान व ऑस्ट्रेलियात एकाच दिवशी चार रुग्ण आढळले होते. दोन्ही देशांची लोकसंख्या अडीच कोटींच्या जवळपास आहे. मात्र आज ऑस्ट्रेलियात साडेसहा हजार रुग्ण आहेत. तैवानने हाच आकडा चारशेच्या पुढे जाऊ दिला नाही. मूळ औरंगाबादचे अभय सुरेश झांबरे हे सध्या तैवानमधील ह्सिंचू (Hsinchu) शहरातील नॅशनल त्सिंगुआ युनिव्हर्सिटीत केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करताहेत. याविषयी ‘सकाळ’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - तैवानने कोरोनाला कसे रोखलेय?
अभय झांबरे - तैवानच्या आरोग्य यंत्रणेने ३१ डिसेंबरपासून चीनच्या वुहान प्रांतातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कडक आरोग्य तपासणी केली. ज्यांना लक्षणे दिसली, त्यांना त्वरित क्वारंटाइन करण्यात आले. याशिवाय प्रवाशांची सार्ससाठीचीही चाचणी केली. तैवान सरकारने देशाच्या सीमेवर कडक तपासणी केली. तैवानला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानाची उड्डाणे बंद केली. ‘कोविड- १९’चा पहिला रुग्ण आढळताच तैवान सरकारने मास्कच्या निर्यातीवर बंदी घातली. दररोज एक कोटी ३० लाख लाख मास्कची निर्मिती केली. त्यामुळे मास्कचा तुटवडा जाणवला नाही. आज इतर देशांनाही तैवानमधून मास्क जाताहेत. सर्व शाळा आणि विद्यापीठांत येणाऱ्या प्रत्येकाचे स्क्रीनिंग करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीचे तापमान मोजले जाते.
हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार
प्रश्न - सार्वजनिक ठिकाणी कोणते नियम आहेत?
अभय झांबरे - शॉपिंग मॉल्स आणि भाजी मार्केटमध्ये मास्क घातल्याशिवाय प्रवेश नसतो. रेस्टॉरंट्स, जिम आणि कॅफेमध्येही व्यक्तीचे तापमान मोजले जाते. ग्राहकांना सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. रेल्वेस्टेशनवरही थर्मल कॅमेरे बसविले आहेत. बस प्रवाशांचे तापमान तपासतात. रेल्वे आणि इंटरसिटी बसमध्ये प्रवाशांना मास्क घालावा लागतो. नियमांचे उल्लंघन केले तर तीन ते १५ हजार NTD (न्यू तैवान डॉलर) म्हणजेच साडेसात ते ३८ हजार रुपये दंड आकारला जातो. तैवानने नियम खूप कडक केले आहेत. जर वापरलेला मास्क रस्त्यावर फेकला तर १५ हजार एनटीडी दंड भरावा लागतो. तैवानच्या एका व्यक्तीला ‘कोविड- १९’ची लक्षणे लपविणे व इतर कारणांनी तब्बल तीन लाख एनटीडी (सात लाख ६३ हजार रुपये) दंड ठोठावण्यात आला होता.
हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस
प्रश्न - तैवानचे लोक चीनकडे कसे पाहतात?
अभय झांबरे - इथले लोक चीनवर विश्वास ठेवत नाहीत. तैवानी लोकांना असे वाटते, की चीनने नोंदविलेली रुग्णांची संख्या खरी नाही. कोरोना हा साथीचा आजार उशिरा उघड केल्याबद्दल तैवानी जनता चीनवर चिडलेली आहे. जपान सरकार चीनमधील उद्योग हलविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तैवानला ही संधी मिळू शकते. आधुनिक तंत्रज्ञान, निरोगी वातावरणामुळे तैवान मजबूत होईल. तैवानने विशेषतः सेमीकंडक्टरमध्ये संशोधन व विकासात आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे.
हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...
प्रश्न - सार्सचा अनुभव कामी आलाय का? पुढे काय?
अभय झांबरे - सार्स या साथीच्या आजारानंतर तैवानने राष्ट्रीय आरोग्य कमांड सेंटरची स्थापना केली. सार्स आजार देशभर पसरलेला होता. या आजाराला कंट्रोल कसे करायचे, याचा अनुभव या सेंटरला होता. त्यामुळे ‘कोविड- १९’ विषाणू जगभर धुमाकूळ घालत असताना तैवानमध्ये आटोक्यात आलाय. सरकारला या सेंटरची मोठी मदत झालीय. आता अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी सर्व देश प्रदीर्घ काळ संघर्ष करतील. भविष्यात साथीच्या रोगाचा धोका टाळण्यासाठी जगाला त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील.
हेही वाचा - युकेचे पंतप्रधान रुग्णालयात, जनता घरात बसून...
हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय...
हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...
from News Story Feeds https://ift.tt/2XOnWvQ
via IFTTT


No comments:
Post a Comment