नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमधून सुरुवात झालेला कोरोना व्हायरस युरोप, अमेरिका, भारत आणि आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 10,453 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तसेच कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार आता याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. त्यामुळे आता इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. तसेच यातील मृतांची संख्याही वाढत आहे. सध्या 10,453 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 358 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 1,181 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
वाचा शिस्तप्रिय जपानच्या लॉकडाऊन विषयी!
महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक
देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची सख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 1985 हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून, 149 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 217 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

३५ ठिकाणं बनली हॉटस्पॉट
राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई, संस्कृतिक राजधानी वाराणसी व पुणे आणि सर्वात स्वच्छ शहराचा मान सातत्याने मिळवणाऱ्या इंदोरसह देशाच्या आठ राज्यांमधील किमान ३५ ठिकाणं कोरोना महासाथीचा हॉटस्पॉट बनली आहेत.

काही भाग पूर्ण सील
हॉटस्पॉट बनलेल्या शहरांमधील एका मागोमाग एक भाग हे पूर्णतः सील करण्याचे धोरण यंत्रणेला अमलात आणावे लागत आहे. सील कराव्या लागणाऱ्या भागांमध्ये वाढ होणार नाही, याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2ygBVQ8
via IFTTT


No comments:
Post a Comment