मुंबई: गेल्या १२ तासांत राज्यात ८२ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या २०६४वर पोहोचली आहे. यात मुंबईतील सर्वाधिक ५९ रुग्णांचा समावेश आहे. काल रविवारी राज्यात १९८२ रुग्ण होते. त्यात आता ८२ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा २०६४ झाला आहे. गेल्या १२ तासांत मुंबईत ५९, मालेगावमध्ये १२, ठाण्यात ५, पुण्यात ३, पालघरमध्ये दोन आणि वसई-विरारमध्ये एक रुग्ण सापडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड, नागपूर, यवतमाळ, जळगाव, औरंगाबादमध्ये गेल्या १२ तासांत एकही रुग्ण सापडलेला नाही.
दरम्यान, मुंबईच्या धारावीत आज सापडलेल्या चार नव्या रुग्णांपैकी एका ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण धारावीच्या नेहरू चाळमध्ये राहतो. तर इतर तीन रुग्णांपैकी एक रुग्ण इंदिरा नगर, जनता हौसिंग सोसायटी आणि गुलमोहर चाळीत राहतात. यात दोन महिलांचा समावेश आहे. करोनाची लागण झालेली गुलमोहर चाळीतील ३४ वर्षीय महिला दादरच्या सुश्रृषा रुग्णालयात नर्स आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या शिवाय त्यांच्या कुटुंबीयांचे सँपल घेण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. तसेच बॉम्बे हॉस्पिटलमधील एका डॉक्टरलाही करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XtY6x2
via IFTTT


No comments:
Post a Comment