मुंबई: राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि संशोधन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून वस्तूंवरील निर्जंतुकीकरणासाठी अतिनील किरणांच्या टॉर्चची निर्मिती राज्यात करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत म्हणाले, दैनंदिन जीवनात आपला विविध वस्तूंना स्पर्श होत असतो आणि त्यातूनच विषाणूंचे संक्रमण इतरांना होण्याची शक्यता असते. विज्ञानातील उपलब्ध माहितीनुसार, कोणताही विषाणू अक्षम करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे अतिनील किरणे. या टॉर्चच्या माध्यमातून १६ ते ३३ वॅट एवढ्या क्षमतेच्या अतिनील किरणांचा पुरवठा होऊ शकतो. एखादी वस्तू भाजीपाला किंवा फळ या टॉर्चच्या संपर्कात आले आणि त्यावर अतिनील किरणांचा मारा झाला तर एकसंधपणे ती किरणे सर्वत्र विखुरली जातात आणि त्या वस्तूचे निर्जंतुकीकरण होते. अतिनील किरणांचा विषाणूंवर मारा झाला की RNA ची रचनाच बदलली जाते. त्यामुळे तो विषाणू स्वतःची संख्या वाढवण्यास असमर्थ ठरतो आणि तिथेच नामशेष होतो.' वाचा: चीनसह अनेक देशांत अतिनील किरणांच्या मदतीनं विविधवाहने (विमानं, हेलिकॉप्टर) बस निर्जंतूक करण्यात येत आहेत. याबरोबरच मोबाइल, संगणक, की-बोर्ड हे देखील निर्जंतूक केले गेले आहेत. भारतामध्ये पाण्यातील जीवजंतू मारून ते शुद्ध करण्यासाठी याचा वापर केला जातो, असं सामंत यांनी सांगितलं. वाचा: खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना विविध वस्तू व नोटांच्या माध्यमातून विषाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. याचा विचार करून तज्ज्ञांच्या मदतीनं या विशेष टॉर्चची निर्मिती करण्यात आली आहे. विजेवर चालणारी ही बॅटरी असून हाताळण्यासाठी फारच सोपी आहे. अतिनील किरणांशी शरीराचा संपर्क आल्यास त्याचे विघातक परिणाम आरोग्यावर होतात. त्यामुळं मानवी शरीराशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे, असंही ते म्हणाले. वाचा: कोणी बनवले हे टॉर्च? सॅनिटायझर टनेल निर्मीती करणारे शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ आर. जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सोनकवडे आणि पूनम सोनकवडे या भावंडांनी या टॉर्चची निर्मिती केली आहे. अनिकेत हे औरंगाबाद विद्यापीठातील दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्र येथे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. तर, पूनम या आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे बी. एस. सी.(सूक्ष्मजीवशास्त्र ) च्या द्वितीय वर्षाला आहेत. सामंत यांनी या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. मुंबईतील विद्याविहार पश्चिमेकडील पीएलए इलेक्ट्रो अप्लायन्सेस प्रा. लि. या कंपनीच्या साह्याने या टॉर्चची निर्मिती करण्यात येत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VsOFLy
via IFTTT


No comments:
Post a Comment