इंजिनिअरची चिमुकली अर्विता म्हणाली ! बाबा वाढदिवस नको पण...  - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, April 19, 2020

इंजिनिअरची चिमुकली अर्विता म्हणाली ! बाबा वाढदिवस नको पण... 

https://ift.tt/eA8V8J

सोलापूर : महाराष्ट्रासह देशाभरात लॉकडाउन असल्याने राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून सर्वजण आपापल्या परीने मुख्यमंत्री सहायता निधी देत आहेत. सोलापुरातील रेल्वे कॉलनीत राहणारी अर्विता आज (रविवारी) सहा वर्षाची झाली. कुटुंबाची परिस्थिती चांगली असल्याने यापूर्वीचे पाच वाढदिवस धुमधडाक्‍यात साजरे झाले. मात्र, यंदाच्या वाढदिवसानिमित्त अर्विताने पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांना कोरोनामुळे घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, असे संदेश दिले आहेत. तर कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांनी दिलेले पैसे अर्विताने डिजी अकाउंटमध्ये साठवले असून ती रक्‍कम मदत म्हणून देण्याचा तिने हट्ट धरला. कुटुंबातील सदस्य ती रक्‍कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. 

हेही नक्‍की वाचा : महाविद्यालयीन परीक्षेबाबत मोठा निर्णय ! थेट तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचीच परीक्षा 

 

अर्विताने पोस्टरद्वारे दिलेले संदेश 
सोशल डिस्टन्सचे पालन करा, कोरोना होईल हद्दपार, घरीच थांबा, विनाकारण बाहेर पडू नका, हात स्वच्छ धुवा अन्‌ निरोगी राहा, मी घरातच राहणार अन्‌ कोरोनाला हरवणार, लोक फिरायचे थांबले की कोरोनाही फिरायचा थांबेल, असे पोस्टर अर्विताने तयार केले आहेत. विशेष म्हणजे अविताचा लहान भाऊ, तिचे आजोबा चंद्रकांत कुलकर्णी, आजी वृषाली कुलकर्णी, आई- वडीलांनी पोस्टर हातात धरून सर्वांना नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अर्विताची आई शिक्षिका असून वडिल ऍटोमोबाइल इंजिनिअर आहेत. तर आजी व आजोबा रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. 

हेही नक्‍की वाचा : मोठी ब्रेकिंग ! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही सन्मान निधी 

 

अर्विता म्हणाली...तुम्ही फिरायचे थांबा, कोरोनाही थांबेल 
सहाव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर अर्विता प्राथमिक शाळेत शिकायला जाणार, त्यामुळे तिचा वाढदिवस चांगल्या पध्दतीने साजरा करण्याचे नियोजन तिच्या कुटुंबियांनी केले. मात्र, कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे देशभर लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे तिचा वाढदिवस साजरा करण्यास अडथळा आला. टिव्ही, वृत्तपत्रांमधील बातम्या ऐकून अर्विताने वडिलांना कागद आणायला लावले आणि पोस्टरद्वारे नागरिकांना आवाहन केले. तर सर्वजण मदत करु लागल्याने तिने साठवलेली रक्‍कम आपणही मदत म्हणून देऊ, अशी इच्छा अर्विताने आई-वडिलांकडे केली. कुटुंबियांनी तिचे कौतूक करीत अर्विताने साठवलेली रक्‍कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला. आता अर्विताच्या डिगी अकाउंटमध्ये कितीही रक्‍कम असली, तरी तिचे कौतूकच करायला हवे. पाच वाढदिवस आनंदाने मोठा खर्च करुन साजरे झाले मात्र, हा वाढदिवस अर्विताच्या आयुष्यातील संस्मरणीय ठरेल हे नक्‍की. 

 

हेही नक्‍की वाचा : सरकारचा मोठा निर्णय ! शासकीय कार्यालयांत सोमवारपासून 10 टक्‍के उपस्थिती 



from News Story Feeds https://ift.tt/2KgLSA3
via IFTTT

No comments:

Post a Comment