मुंबई: धारावीला करोनाचा विळखा; तिघांचा मृत्यू - Maharashtra Mazaa

Latest

Monday, April 13, 2020

मुंबई: धारावीला करोनाचा विळखा; तिघांचा मृत्यू

https://ift.tt/3cbkHSY
मुंबई: धारावीला बसलेली करोनाची मगरमिठी अद्याप सुटताना दिसत नाही. धारावीत आज पुन्हा ७ नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तिसरा रुग्ण हा करोनाबाधित होता की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या ५५वर गेली असून मृतांचा आकडा ८वर गेला आहे. धारावीत आज सापडलेल्या सात रुग्णांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. धारावीच्या कल्याणवाडीत एक ५२ वर्षाचा रुग्ण सापडला होता. त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. ११ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला होता. आज त्याचा रिपोर्ट आला असता त्याचा मृत्यू करोनानेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर जनता सोसायटीत एक पुरुष आणि एका महिलेला, राजीव नगरमध्ये एका महिलेला आणि मुस्लिम नगरमध्ये एका पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. मुस्लिम नगरमध्ये आणखी एक करोना रुग्ण सापडला असून त्याचा सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या ५५वर गेली आहे. महिलेचा मृत्यू तर धारावीच्या राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्वॉरंटाइन असलेल्या ५५ वर्षीय महिलेला काल रात्री उशिरा सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला हायपर टेन्शन आणि मधुमेहाचा त्रास होता. ही महिला करोना पॉझिटिव्ह होती की नाही? याचं निदान झालेलं नाही. तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचं पालिकेने स्पष्ट केलं.

धारावीच्या डॉ. बलिगा नगरमध्ये आतापर्यंत ५, वैभव अपार्टमेंट, मदिना नगर, मुरुगन चाळ, राजीव गांधी चाळमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत. मुकुंदनगरमध्ये ९, मुस्लिम नगर आणि जनता सोसायटीत प्रत्येकी ७, सोशल नगरमध्ये ६, कल्याणवाडीत आणि शास्त्रीनगरमध्ये प्रत्येकी चार करोना रुग्ण सापडले आहेत. तर धनवाडा चाळ, पीएमजीपी कॉलनी, नेहरू चाळ, इंदिरा चाळ आणि गुलमोहर चाळमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत. तर बलिगा नगर आणि कल्याणवाडीमध्ये प्रत्येकी २, मुस्लिम नगर, सोशल नगर आणि नेहरू चाळमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34AT6Ig
via IFTTT

No comments:

Post a Comment