बुलडाणा : शहरातील एका कोरोनाग्रताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील चौघांना याची लागण झाली होती. यापैकी तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे बुलडाणेकरांना ही दिलासादायक बातमी ठरणारी आहे.
बुलडाणा शहरात 29 मार्च रोजी एका संशयिताचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर सदर व्यक्तीचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. प्रशासनाने धावपळ करीत सदर व्यक्तीच्या निकट संपर्कातील अनेकांना ताब्यात घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. यापैकी चौघांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने बुलडाण्यातील कोरोना बाधितांची संख्या पाच झाली होती. या चौघांनाही कोरन टाईन करून ठेवण्यात आलेले होते.
हेही वाचा - बाळा मी लवकरच येईल...
14 दिवसांनंतर त्यांचे पुन्हा नमुने पाठविण्यात आले. यापैकी तिघांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित. या चौघांपैकी एकाचा नमुना पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने त्याला पुन्हा क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आलेले आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2Vzk92N
via IFTTT


No comments:
Post a Comment