सकाळ ब्रेकिंग ! इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांची उपासमार    - Maharashtra Mazaa

Latest

Friday, April 17, 2020

सकाळ ब्रेकिंग ! इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांची उपासमार   

https://ift.tt/eA8V8J

सोलापूर : इंजिनिअरिंग महाविद्यालयांमधील बहूतांश प्राध्यापकांना शिष्यवृत्तीच्या रकमेतून वेतन दिले जाते. 2019-20 मध्ये राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाकडून 970 कोटी रुपये मिळणे अपेक्षित असतानाही आतापर्यंत 476 कोटी 62 लाख रुपये मिळाले. अद्याप 520 कोटी रुपयांचे परीक्षा व शिक्षण शुल्क शासनाकडेच प्रलंबित असल्याने मागील सहा महिन्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांमधील तब्बल 40 हजारांहून अधिक प्राध्यापकांसह अन्य कर्मचाऱ्यांना उसनवारी करावी लागत आहे. 

 

हेही नक्‍की वाचा : राज्याची पावणेतीन लाख कोटींची उलाढाल लॉकडाउनमुळे ठप्प 

 

 

राज्यातील अनुसूचित जाती या प्रवर्गातील चार लाख 95 हजार 416 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांकडे अर्ज केले. त्यापैकी तीन लाख 80 हजार 917 विद्यार्थ्यांच्या अर्जाची महाडीबीटीकडून पडताळणी करण्यात आली. या विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागाने एक हजार 137 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप दोन लाख 11 हजार 827 विद्यार्थ्यांच्या अर्जांची पर्सनल फंड मॅनेजमेंट सिस्टिममधून (पीएफएमएस) पडताळणी झालेली नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे तब्बल 595 कोटी 49 लाखांची शिष्यवृत्ती पेन्डींग राहिली आहे. एक वर्ष सरले तरीही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्‍कम मिळालेली नाही. दुसरीकडे अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांना परीक्षा व शिक्षण शुल्क न मिळाल्याने प्राध्यापकांचे वेतन झालेले नाही. 

हेही नक्‍की वाचा : कामगारांसाठी मोठा निर्णय ! दोन टप्प्यात मिळणार पाच हजार रुपये 

लॉकडाउननंतर जमा होईल शिष्यवृत्ती 
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या चार लाख 19 हजार 471 विद्यार्थ्यांपैकी एक लाख 69 हजार 90 विद्यार्थ्यांना 65 कोटी 65 लाखांची शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली आहे. तर महाविद्यालयांनाही शिक्षण व परीक्षा शुल्कापोटी 476 कोटी 62 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. आता केंद्र सरकारच्या पीएफएमएसद्वारे उर्वरित अर्जांची पडताळणी सुरु असून काही दिवसांत संपूर्ण रक्‍कम वितरीत होईल. 

हेही नक्‍की वाचा : काही जिल्ह्यांमध्ये सुरु होणार लालपरी...तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का ? 

 

राज्यातील शिष्यवृत्तीची स्थिती 
एकूण अर्जदार विद्यार्थी 
4,95,416 
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी 
4,19,471 
शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी 
1,69,090 
शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेतील विद्यार्थी 
2,11,827 
शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्‍कम 
595.49 कोटी 



from News Story Feeds https://ift.tt/34GCNtA
via IFTTT

No comments:

Post a Comment