परिवहनमंत्री म्हणाले ! उद्योग अन्‌ बससेवा सुरु करण्याचे नियोजन पण...  - Maharashtra Mazaa

Latest

Saturday, April 18, 2020

परिवहनमंत्री म्हणाले ! उद्योग अन्‌ बससेवा सुरु करण्याचे नियोजन पण... 

https://ift.tt/eA8V8J

सोलापूर : महाराष्ट्रासह देशभरात 22 मार्चपासून लॉकडाउन असून आता 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. उद्योग, व्यवसाय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने राज्यातील तब्बल तीन लाखांपर्यंत उलाढाल ठप्प झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता 22 एप्रिलनंतर टप्प्याटप्याने लॉकडाउन शिथील करुन उद्योग व परिवहन सेवा सुरु करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला जाणार असून केंद्राच्या मान्यतेनुसार कार्यवाही केली जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. 

हेही नक्‍की वाचा : टोल वसुली पुन्हा सुरु होणार ! केंद्र सरकारची मान्यता 

 

लॉकडाउननंतर मुंबईतील अत्यावश्‍यक सेवेसाठी मुबलक प्रमाणात बस उपलब्ध करुन देण्यात आल्या. आता राज्यातील बहूतेक जिल्ह्यांमध्ये अत्यावश्‍यक सेवेसाठी बससेवा सुरु करण्याचे नियोजन झाले असून मागणीनुसार बस उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही परिवहनमंत्री परब म्हणाले. राज्यातील कोणत्या सुरक्षित ठिकाणी, सुरक्षित जिल्ह्यांमध्ये बससेवा सुरु करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी 22 एप्रिलनंतर राज्यातील उद्योग टप्प्याटप्याने सुरु करण्याचे नियोजन केले आहे. त्याचे नियोजन (प्रस्ताव) केंद्र सरकारला पाठविले जाईल आणि केंद्र सरकारकडून ज्या पध्दतीने मान्यता मिळेल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

हेही नक्‍की वाचा : महाविद्यालयीन परीक्षेचा मोठा निर्णय ! देशभरात राहणार एकच पॅटर्न 

अत्यावश्‍यक सेवेसाठी बस उपलब्ध 
लॉकडाउनच्या कालावधीत ज्या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्‍यक सेवांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस लागणार असतील, तर त्या उपलब्ध करुन दिल्या जातील. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यावश्‍यक असून बससेवा सुरु करण्याबरोबरच उद्योग सुरु करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारला अहवाल पाठविला जाईल. दरम्यान, ज्या जिल्ह्यांमध्ये बस अथवा उद्योग सुरु करणे सुरक्षित आहे, अशा ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद सुरु असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले. 

 

हेही नक्‍की वाचा : महाविद्यालयीन परिक्षेबाबत निर्णय ! थेट तिसऱ्या वर्षाचीच होणार परीक्षा 

मुंबईत अत्यावश्‍यक सेवेसाठी 350 बस सुरु राहतील 
मंत्रालयातील विविध कामांसाठी 10 टक्‍के कर्मचारी वाढविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार त्या भागात अतिरिक्‍त बस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. मुंबई भागात अत्यावश्‍यक सेवेसाठी एकूण 350 बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 30 टक्‍के कर्मचारी वाढीचा निर्णय अद्याप झालेला नसून 10 टक्‍के कर्मचारी वाढणार असल्याने त्याप्रमाणात बस उपलब्ध करुन देण्याचे नियोजन झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक राहूल तोरो यांनी स्पष्ट केले.



from News Story Feeds https://ift.tt/2VlUrjv
via IFTTT

No comments:

Post a Comment