औरंगाबाद : औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत कोरोनाग्रस्त महिलेची प्रसुती केली आहे. ही जगातली पाचवी, तर देशातली दुसरी घटना ठरली आहे.
मुंबईतून रुग्णवाहिका करून शहरात आलेल्या तीस वर्षीय गर्भवतीला आणि १७ वर्षीय मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज आणखी एका १५ वर्षीय मुलालाही कोरोना झाल्याचे समोर आले. या नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेचे सिझेरियन आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी केले. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याचे डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. एकीकडे कोरोनाचे युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी या नव्या जीवाचाही मार्ग सुकर करुन दिला. कोरोनाच्या संकटातील जगातील ही पाचवी प्रसूती ठरली. यापूर्वी चीन, लंडन, ऑस्ट्रोलिया आणि मुंबईत अशी प्रसूती करण्यात आली होती.
डॉक्टर सज्जच होते
मुंबईवरून प्रसूतीसाठी ही महिला पती आणि मुलासह १० एप्रिलला औरंगाबादला भावाकडे आली होती. महापालिकेच्या नाक्यावर त्यांना रुग्णालयात तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हे कुटुंब जिल्हा रुग्णालय येथे 13 एप्रिलला तपासणीला गेले. या कुटुंबाची कोवीड -19 चाचणी केली असता वडिलांची चाचणी निगेटिव्ह आली, पण सतरा वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा
हा धक्का बसतो न बसतो, तोच या गर्भवतीलाही कोरोनाची लागण झाल्याचे १६ एप्रिलला स्पष्ट झाले. रिपोर्ट डॉक्टरांना समजेपर्यंत तिला प्रसवकळा सुरु झाल्या. त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. या महिलेची प्रसूती कधीही होऊ शकते, हे पाहून जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची टीम सज्जच होती.
या डॉक्टरांनी केली मोहिम फत्ते
शुक्रवारपर्यंतही (ता. 17) तिची सामान्य प्रसूती झाली नाही. त्यामुळे शनिवारी (18) तिचे सिझेरियन करण्याचे ठरले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कमलाकर मुदखेडकर, डॉ. कविता जाधव, भूलतज्ज्ञ डॉ. पी. एम. कुलकर्णी, डॉ. भारती नागरे, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुरेखा ढेपले, डॉ. ज्योती दारवंटे, आशा मेरी थॉमस आणि दोन कर्मचाऱ्यांनी ही मोहिम फत्ते केली.
औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू
बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत. बाळाचे वजन सुमारे सव्वा तीन किलो भरले असून, त्या नवजात मुलीचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यांचे स्वॅबचे प्रत्येकी तीन नमुनेही घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
from News Story Feeds https://ift.tt/3bfbkBM
via IFTTT


No comments:
Post a Comment