पालघर जिल्ह्यात आणखी चौघांना लागण; रुग्णसंख्या शंभरच्या जवळ - Maharashtra Mazaa

Latest

Saturday, April 18, 2020

पालघर जिल्ह्यात आणखी चौघांना लागण; रुग्णसंख्या शंभरच्या जवळ

https://ift.tt/34LEbuZ
पालघर: मुंबई व ठाण्याला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातही करोनाचा संसर्ग वाढला असून येथील रुग्णांची संख्या १००च्या जवळ पोहोचली आहे. येथील डहाणू तालुक्यात आज चौघे जण कोविड पॉझिटिव्ह आढळले असून जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा आता ९७ झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये ३ व ७ वर्षांच्या दोन लहान मुलींसह एका ४५ वर्षीय पुरुषाचा व ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे चौघेही डहाणू तालुक्याच्या आदिवासी भागातील रानशेत गावच्या ओझर पाडा येथील आहेत. ते काटाळे येथील वीटभट्टीवरून परतले होते. कटाळे येथील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असल्यानं त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आज सकाळी मिळाला. त्यानुसार या चौघांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. वाचा:

वाचा:

जिल्ह्यात आतापर्यंत २१३२ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ७३० जण होम क्वारंटाइन आहेत. तर, १२५ जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यातील ४३ जण हॉटेल रॉयल गार्डन इथं, १२ जण हॉटेल सुर्वी पॅलेस इथं तर, उर्वरित कोविड केअर सेंटरमध्ये आहेत. स्वॅब टेस्ट घेतलेल्या १४६९ जणांपैकी ९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ७०९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ६६३ जणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ai7Wox
via IFTTT

No comments:

Post a Comment