मुंबई: मुंबईतील वस्त्यांपाठोपाठ आता मुंबईतील करोनाची ठरताना दिसत आहेत. ताडदेवच्या भाटिया रुग्णालयात रविवारी ११ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. आज हा आकडा २५वर गेला आहे. त्यामुळे मुंबईच्या वोकहार्ट रुग्णालयानंतर भाटिया रुग्णालय करोनाचा दुसरा हॉटस्पॉट बनला आहे. वोकहार्टमध्ये ५२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती, त्यामुळे हे रुग्णालय सील करण्यात आले आहे. सेव्हन हिल्समध्येही दोन डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे. यातील एक डॉक्टर एमर्जन्सी ड्युटीवर आहे तर दुसरा डॉक्टर रुग्णांना डिस्चार्ज देण्याचं काम करत आहे. त्याशिवाय सायन रुग्णालयातील एका डॉक्टरलाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तसेच सायन हॉस्पिटलमध्ये एक नर्सलाही लागण झाल्याचं समोर आलं आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी आदी १०० जणांना करोनाची लागण झाली आहे. यात वोकहार्ड ५२ भाटिया २५, नूर रुग्णालय, साबू सिद्दीकी रुग्णालय, नायर, सैफी, सेवन हिल्स आणि सायन रुग्णालयात प्रत्येकी एका आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. भाटीयामधील १५० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १३९ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर ११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. भाटियामध्ये सर्वात आधी करोनाचे तीन रुग्ण सापडले होते. त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता करोनाचे १४ रुग्ण सापडले होते. जसलोक रुग्णालयातही २१ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आले होतं. अनेक रुग्णालयातील कर्मचारी क्वॉरंटाइन असल्याने या रुग्णालयांकडे रुग्णालय चालविण्यासाठी स्टाफच राहिलेला नाही. ही रुग्णालये बंद झाल्यामुळे परिसरातील इतर रुग्णालयात रुग्णांना घेऊन जाण्यास लोक मागेपुढे पाहत असल्याचं पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2JZQgU3
via IFTTT


No comments:
Post a Comment