नवी दिल्ली - तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांना ईडीने मोठा दणका दिला असून त्यांची चौकशी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. साद यांच्याविरोधात पीएमएलएअंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यावेळी ईडी तबलिगी जमातला दिल्या जाणाऱ्या निधीची तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी मौलाना साद यांच्यासह 9 जणांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. मरकजमध्ये गर्दी जमवून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले होते. मरकजमध्ये हजारो लोक राहत होते. यावेळी त्यांच्या राहण्या-खाण्यासाठी कुठून निधी दिला जात होता, मरकजमध्ये भारतातील अनेक राज्यांतून आणि परदेशातून मोठ्या संख्येने लोक आले होते. यावेळी त्यांना कोणी स्पॉन्सर केलं वा त्यांच्या प्रवासाचा खर्च कोणी व कसा दिला? असा प्रश्न ईडीकडून उपस्थित करण्यात आला आहे.
<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">9 people including Maulana Saad (Tablighi Jamaat Chief) is on Enforcement Directorate (ED) radar. ED will also investigate the trust of Maulana Saad and transactions of trust will also be investigated: Sources <a href="https://t.co/cG8jJ5ydxm">https://t.co/cG8jJ5ydxm</a></p>— ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1250795921702416384?ref_src=twsrc%5Etfw">April 16, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
मरकज सोडल्यानंतर अनेक लोक भारतातील विविध भागांमधील मशिदीत लपून होते. त्यांनी दिल्ली ते विविध भागांतील मशिदींपर्यंत प्रवास कसा केला? त्यांचा बस, हवाई वाहतूक, टॅक्सीचा खर्च कोणी केला? असेही प्रश्न ईडीकडून करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार दैनंदिन व्यवहारात जमात कॅशचा वापर करीत होते. ही कॅश कशी मिळाली याचा ईडीकडून तपास केला जाणार आहे. तबलिगी जमातला परदेशी फंड मिळत होता का? याचाही ईडीकडून तपास केला जाणार आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2RMq0Rb
via IFTTT


No comments:
Post a Comment