...तर वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल: आंबेडकर - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, April 15, 2020

...तर वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल: आंबेडकर

https://ift.tt/34EaTP9
पुणे: लॉकडाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. वाढविल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांना उपासमारीची वेळ येईल असे वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही म्हणून त्याचा वांद्रे येथे उद्रेक झाला. शासनाने आता तरी जागं व्हावं. शासनाने योग्य ती पावलं उचलली नाही तर त्याचा उद्रेक देशभर होईल; असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला. त्यांनी हजारोंच्या संख्येने वांद्रे टर्मिनस येथे गर्दी करून या लॉकडाऊनला विरोध केला. लॉकडाऊन वाढवल्याने आपल्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती या कामगारांना वाटली आणि त्यातूनच हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगविला, असं सांगतानाच शासनाकडे अन्नधान्याचा प्रचंड साठा असल्याने सरकारने हातावर पोट असलेल्यांना दोन महिन्याचे धान्य मोफत वाटावे, अशी आम्ही विनंती केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने वांद्रे येथे मजुरांचा उद्रेक झाला, असा दावा आंबेडकरांनी केला आहे. शासनाने कृती करण्याऐवजी २१ दिवसांमध्ये करोना कसा थांबवला याचंच गुणगान करण्यात सरकार मश्गुल आहे.परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना काय सुविधा, मदत देणार, याबाबत प्रशासनाकडून काहीच अपेक्षित उत्तर देण्यात आलेलं नाही किंवा तसा खुलासाही झाला नाही. त्यामुळे वांद्रे सारखे उठाव आता महाराष्ट्रभर होतील आणि असे उठाव झाले तर देशभर उठाव व्हायला वेळ लागणार नसल्याचेही आंबेडकर म्हणाले. त्यामुळे जागे व्हा आणि कामाला लागा, असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं आहे. दरम्यान, गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी कामगारांनी अशाच प्रकारे सरकार विरोधात आवाज उठवत रस्त्यावर आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनावरील नाराजी आता दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आता गुजरातमध्येही लॉकडाऊनला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. असे उठाव देशभर होणार असल्याचे संकेत आंबेडकरानी दिल्यानंतर काही तासांतच सुरतमध्येही कामगारांनी आंदोलन केल्याचं समोर आलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2K3Vj5B
via IFTTT

No comments:

Post a Comment