मुंबई: आज आणि दादरमध्ये ८ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ५ रुग्ण धारावीतील, दोन रुग्ण आणि एक रुग्ण माहीममधीलआहे. त्यामुळे धारावीतील रुग्णांची संख्या ६०वर गेली आहे. धारावीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झालेला आहे. आज दोन नवे रुग्ण सापडल्याने दादरमधील रुग्णांची संख्या २१वर गेली आहे. तर माहीममधील करोना रुग्णांची संख्या ७वर गेली आहे. धारावीत सापडलेल्या पाच नव्या रुग्णांपैकी दोन महिला आहेत. हे सर्व रुग्ण २४ ते ४७ वयोगटातील असून पाचही जण धारावीच्या मुकुंदनगरमधील रहिवासी आहेत. धारावीत आतापर्यंत मुकुंद नगरमध्ये १४, मुस्लिम नगर आणि जनता सोसायटीत प्रत्येकी ७, सोशल नगरमध्ये ६, बलिगा नगरमध्ये ५, शास्त्री नगर आणि कल्याणवाडीत प्रत्येकी ४, वैभव अपार्टमेंट्स, मुरुगन चाळ, राजीव गांधी चाळ आणि मदिना चाळमध्ये प्रत्येकी दोन आणि धनवाडा चाळ, पीएमजीपी कॉलनी, नेहरु चाळ, इंदिरा चाळ आणि गुलमोहर चाळमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडलेला आहे. तर मुस्लिम नगर, सोशल नगर, नेहरु चाळमध्ये प्रत्येकी एक तर बलिगा नगर आणि कल्याणवाडीत प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
दादरमध्ये एका ७५ वर्षीय महिलेला आणि ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. हे दोघेही शिवाजी पार्क परिसरात राहतात. त्यामुळे दादरमधील रुग्णांची संख्या २१वर गेली आहे. दादरमध्ये आतापर्यंत सुश्रुषा रुग्णालयात दोन डॉक्टर आणि ६ नर्ससह ८जणांना, तावडेवाडीत २१, केळकर रोड आणि शिवाजी पार्क येथे प्रत्येकी दोन आणि दिनकर अपार्टमेंट, सौभाग्य अपार्टमेंट, कासारवाडी, आणि आंबेडकर नगरमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली आहे. तर माहीमच्या प्रकाश नगरमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे माहीममधील करोना रुग्णांची संख्या ७वर गेली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XEch2y
via IFTTT


No comments:
Post a Comment