नगर जिल्ह्यात करोनाचा दुसरा बळी; कोपरगावात महिलेचा मृत्यू - Maharashtra Mazaa

Latest

Tuesday, April 14, 2020

नगर जिल्ह्यात करोनाचा दुसरा बळी; कोपरगावात महिलेचा मृत्यू

https://ift.tt/3bbRK9y
अहमदनगर येथील ६० वर्षीय ‘करोना’बाधित महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी ही माहिती दिली. या महिलेवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने संबंधित महिलेला कोपरगाव येथून जिल्हा रुग्णालयात आणले होते. तिच्या घशातील स्त्राव नमुना घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल १० एप्रिलला प्राप्त झाला, त्यात ही महिला ‘करोना’बाधित असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर बूथ हॉस्पिटलच्या ‘आयसोलेशन वार्ड’मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती विषयक तक्रार असल्याने तिला अधिक तपासणीसाठी ११ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथेच या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, ‘करोना’शी झुंज देत असलेल्या या महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. कोपरगाव येथील महिलेचा मृत्यु झाल्यामुळे नगर जिल्ह्यातील ‘करोना’मुळे मृत्यु झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी १० एप्रिलला श्रीरामपूरच्या ‘करोना’बाधित २७ वर्षीय तरुणाचा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या तरुणाला ‘करोना’ची बाधा झाल्याचे पुणे येथेच समोर आले होते, व त्यानंतर त्याच्यावर तेथेच उपचार सुरू होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Rv80e3
via IFTTT

No comments:

Post a Comment