Maharashtra Rain Live: राज्यात सकाळपासून पावसाची उघडीप - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, October 14, 2020

Maharashtra Rain Live: राज्यात सकाळपासून पावसाची उघडीप

https://ift.tt/3j0nVMb
मुंबई/पुणे: परतीच्या पावसानं राज्यातील अनेक भागांना जोरदार तडाखा दिला आहे. शहरात काल झालेल्या पावसाने गेल्या दहा वर्षातील विक्रम मोडले आहेत. आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली असली तरी मुंबई, ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. जाणून घ्या पावसाबद्दलचे सर्व अपडेट्स Maharashtra Rain Live Updates: कोल्हापूर: पंचगंगा नदीचे पाणी १७ फुटांवर. जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली कोल्हापुरात पावसाची रिपरिप कायम. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. अनेक रस्ते झाले बंद अहमदनगर: मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने या धरणातून मुळा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग वाढवला आहे. आता २ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू अहमदनगर: नगर-पुणे महामार्गावर कोरेगाव भिमाजवळ पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत. वाहनांच्या लांबलचक रांगा अहमदनगर: कृषी विभागाच्या अंदाजानुसार नगर जिल्ह्यातील ३० हजार हेक्टर वरील पिके पाण्याखाली. सोयाबीन, बाजरी मका यांचे मोठे नुकसान. अहमदनगर: जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ८६ गावांत अतिवृष्टीची नोंद. कर्जत जामखेड, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांना सर्वाधिक फटका. पुणे: सिंहगड रस्त्यावरील दुकानांत पाणी. मोठे नुकसान पुणे: सिंहगड रोडवरील मधुकर हॉस्पिटलमध्ये पाणी शिरल्याने ऑपरेशन थिएटर व इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान बारामतीमधील कुऱ्हा नदी दुथडी भरून वाहतेय! पुण्यात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित. केबल तुटल्याने इंटरनेट बंद गेल्या १२ तासांत नवी मुंबई, मुंबई शहरातील काही भागांत ७० ते १०० मिलीमीटरचा पाऊस एनडीआरएफचे प्रत्येकी एक पथक लातूर व सोलापूरला रवाना अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव भरला असून सांडव्यातून वाहणारे पाणी पुलावर आले आहे. त्यामुळे नगर ते वांबोरी वाहतूक विस्कळित जळगाव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. साडेआठनतंर तुरळक पावसाला सुरुवात कोल्हापूर: पाच दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर येथील कळंबा तलाव पुन्हा एकदा ओवरफ्लो अहमदनगरमध्ये पहाटेपासून पावसाची उघडीप; मात्र नद्यांना पूर पुण्यात मध्यरात्रीनंतर पावसाची विश्रांती. अनेक ठिकाणी पाणी ओसरले मुंबई, ठाण्यात सकाळपासून पाऊस नाही. मात्र वातावरण ढगाळ मुंबई, ठाण्यासाठी हवामान विभागानं जारी केला रेड अॅलर्ट. अतिवृष्टीचा इशारा


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2FvrVH1
via IFTTT

No comments:

Post a Comment