IPL वर सट्टेबाजी; मुंबईतून पाच जणांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई - Maharashtra Mazaa

Latest

Tuesday, October 6, 2020

IPL वर सट्टेबाजी; मुंबईतून पाच जणांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

https://ift.tt/eA8V8J

मुंबई: देशावर ओढावलेल्या कोरोना संक्रमणाचा फका यंदा आयपीएललाही सोसावा लागला. त्यामुळेच यंदाची आयपीएल  यूएइमध्ये आयोजित करण्यात आली. कोरोना संक्रमणाच्या भीतीने प्रेक्षकांच्या शिवाय आयपीएल होत असल्याने यंदा स्पर्धेदरम्यान मोठी सट्टेबाजी होण्याची शक्यता असताना, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना आयपीएलवर सट्टा खेळताना रंगेहाथ अटक केली आहे.  या पाच जणांकडून पोलिसांनी 9 मोबाइल आणि 44 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. 

दुबईत गुरूवारी खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळवला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भायखळाच्या टिंबर मार्केट, दारूखाना, आर अँण्ड स्टिल अँण्ड आलाँयस गाळा येथे छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना वसिम वलयानी, मोह. हानिफ हशम सोराटिया, शोएब झीयाउल हक्क अन्सारी, समीर पवार या पाच बुकींना सट्टा लावताना रंगेहाथ अटक केली. हे बुकी मुंबईत बसून युएइमध्ये होणाऱ्या आयपीएलवर सट्टा लावत होते. या सट्टा लावणाऱ्या पाच मुलांसह गुन्हे शाखेला  एका डायरी सापडली आहे. या डायरीमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या इतर बुकींची नावं आणि त्याचं डिटेल्स मिळाले आहे. त्यामुळे लवकरच गुन्हे गुन्हेशाखेकडून मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या पाच तरुणांची कसून चौकशी केली जात आहे. यांच्या मार्फत मुंबईत सट्टेबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते.

अधिक वाचाः  मुंबईत प्रसिद्ध महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे 10 कोटींच्या खंडणीची मागणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सची टीम बुकींची आवडती आहे. मुंबई टीमवर 4.90 रुपये इतका भाव लावण्यात आला आहे. मुंबई मागोमाग हैदराबादच्या टीमला बुकींकडून पसंती दिली जात आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच गुरुग्राम पोलिसांनी त्यांची इंटेलिजंट विंग, गुन्हे शाखा  आणि सर्व जिल्ह्यांतील स्टेशन ऑफिसर यांना सट्टेबाजांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे सट्टेबाजाराला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असताना बुकींनी मात्र आपल्या आवडत्या संघासाठी भावही ठरवलेत.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Betting on IPL Five arrested from Mumbai police



from News Story Feeds https://ift.tt/2Szvy1m
via IFTTT

No comments:

Post a Comment