धक्कादायक! हाथरस प्रकरणात FSL टेस्टला उशीर; बलात्कार झाल्याचे पुरावे मिळणार नाहीत - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, October 4, 2020

धक्कादायक! हाथरस प्रकरणात FSL टेस्टला उशीर; बलात्कार झाल्याचे पुरावे मिळणार नाहीत

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली -  उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिस शवविच्छेदनात सामूहिक बलात्कार झाल्याचा उल्लेख नसल्याचं सांगत आहे. आता अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी धक्कादायक अशी माहिती दिली आहे. 

हाथरसमधील पीडितेला 14 सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी तिच्यावर दोन आठवडे उपचार सुरु होते. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं की, ज्याच्या आधारावर उत्तर प्रदेश पोलिस मुलीवर सामूहिक बलात्कार झाला नसल्याचा दावा करत आहे तो एफएसएल रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने घेण्यात आला. घटनेच्या 11 दिवसांनी एफएसएल रिपोर्टसाठी सॅम्पल घेण्यात आलं होतं. इतक्या दिवसांनी घेतलेल्या सॅम्पलमुळे रिपोर्टला काहीच किंमत नाही. 

हे वाचा - उत्तर प्रदेश पोलिसांना पश्चाताप; प्रियांका गांधींसोबतच्या वर्तनाबाबत मागितली माफी

अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे सीएमओ डॉक्टर अजीम मलिक यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, घटनेनंतर 11 दिवसांनी सॅम्पल घेतले होते. अशा गुन्ह्यांमध्ये 96 तासांपर्यंत फॉरेन्सिंक पुरावे सापडू शकतात. त्यानंतर बलात्कार सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे मिळू शकत नाहीत. 

सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवल्यानंतरच पोलिसांनी बलात्काराची कलमे एफआयआरमध्ये नोंद केली. घटनेच्या 11 दिवसांनी 25 सप्टेंबरला पीडितेची सॅम्पल एफएसएल तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. या रिपोर्टच्या आधारावरच उत्तर प्रदेश पोलिसांनी मुलीवर सामूहिक बलात्कार झाला नसल्याचा दावा केला आहे. 

हे वाचा - काँग्रेसला उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवायचीय; योगींचा गंभीर आरोप

एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी म्हटलं होतं की, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी रिपोर्टमध्ये मुलीच्या शरीरात स्पर्म आढळून आलेलं नाही. तसंच रिपोर्टमध्ये मुलीचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असल्याचंही सांगण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतरही माध्यमांकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचं प्रशांत कुमार यांनी म्हटलं होतं. 



from News Story Feeds https://ift.tt/3ni1OUZ
via IFTTT

No comments:

Post a Comment