शिमला: माजी राज्यपाल आणि CBI चे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी बुधवारी आत्महत्या केली आहे. कुमार यांनी शिमल्यातील स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबद्दलची माहिती शिमलाच्या एसपी मोहित चावला यांनी देऊन ही खूपच धक्कादायक बाब असल्याचे सांगितले. चावला यांनी सांगितले की पोलीस आधिकाऱ्यांसाठी अश्वनी कुमार हे एक आदर्श होते. शिमल्यातील ब्रॅक फास्टमधील घरात कुमार यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही मिळाली आहे. त्यात जिवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहलेले आहे.
अश्वनी कुमार (Ashwini Kumar) हे 70 वर्षाचे होते. यापुर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशात पोलीस मंहासंचालक म्हणूनही काम केले होते. सुत्रांच्या माहितीनुसार कुमार हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. पण याबद्दल बोलताना पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी कुमार यांच्या आत्महत्येचं कारण समजलं नसल्याचे सांगितले आहे. आत्महत्या झालेल्या ठिकाणावरून पोलीसांनी एक सुसाइड नोटही जप्त केली आहे. पोलीस या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करत आहेत. पोस्टमार्टमचे रिपोर्ट आल्यानंतरच या आत्महत्या प्रकरणाचा सविस्तर उलघडा होईल, अशी माहिती पोलीसांनी दिली.
हे वाचा - रेल्वेने आरक्षणासंबंधी बदलले नियम; जाणून घ्या माहिती
अमित शहांना अटक केले होते-
मार्च 2013 ते जून 2014 काळात अश्वनी कुमार यांनी नागालॅंड आणि मनिपुरचे राज्यपालपदही भूषविले होते. त्याअगोदर 2006 ते 2008 दरम्यान कुमार हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. तसेच 2008- 2010 दरम्यान त्यांनी CBI चे संचालक म्हणून काम करताना सोहराबुद्दीन शेखच्या बनावट एनकाउंटर प्रकरणात अमित शहा यांना अटक केले होती.
हे वाचा - खुशखबर : भारतीयांनी शोधला कोरोनावरील उपचार; ट्रायलला मिळाली परवानगी
1985 साली शिमल्याचे एसपी असताना कुमार यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये( SPG) नेमणूक केली होती. 1985- 1990 दरम्यान कुमार यांनी एसपीजीच्या अनेक पदांवर काम केले होते. यासोबतच कुमार यांनी PMOमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. तसेच त्यांनी देशाच्या गुप्तचर संस्थेतही आपल्या सेवेचं योगदान दिले आहे.
from News Story Feeds https://ift.tt/34ylWcV
via IFTTT


No comments:
Post a Comment