दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होणे शक्य; अमेरिकेत रुग्ण आढळला - Maharashtra Mazaa

Latest

Tuesday, October 13, 2020

दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होणे शक्य; अमेरिकेत रुग्ण आढळला

https://ift.tt/eA8V8J

ह्युस्टन - एकदा कोरोनामुक्त होऊनही दुसऱ्यांदा पुन्हा संसर्ग होऊ शकतो आणि दुसऱ्या संसर्गात या आजाराची अधिक तीव्र लक्षणे दिसू शकतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे. अमेरिकेत तसा रुग्ण आढळला आहे. 

अमेरिकेतील नेवादा विद्यापीठातील संशोधकांनी केलेले हे संशोधन लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. एका व्यक्तीला दोन वेळेस कोरोना झाल्याचे या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. हा रुग्ण एक २५ वर्षांचा युवक असून त्याला ४८ दिवसांत दोन वेळेस कोरोनाचा संसर्ग झाला. पहिल्यांदा संसर्ग होऊन त्यातून काही दिवसांतच मुक्त झाला होता. दोन्ही वेळेसच्या कोरोना विषाणूचा प्रकार वेगवेगळा असल्याचेही दिसून आले आहे. या युवकाला दुसऱ्यांदा झालेला संसर्ग अधिक गंभीर स्वरुपाचा होता. त्याला रुग्णालयात दाखल करून प्राणवायूही द्यावा लागला. त्यामुळेच, एकदा कोरोनामुक्त झाल्यास पुन्हा या विषाणूचा संसर्ग होऊ शकत नाही, याची खात्री देता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत अधिक संशोधन आवश्‍यक असले तरी नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुसऱ्यांदा कोरोनाग्रस्त झालेल्याची लक्षणे
संबंधित युवक एप्रिल महिन्यात कोरोनामुक्त झाल्यानंतर काही दिवसांनंतर त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, जून महिन्यात त्याला ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, खोकला, वास न येणे, अतिसार असे त्रास सुरु झाले आणि रुग्णालयात भरती करावे लागले. यावेळी चाचणी घेतली असता त्याला पुन्हा एकदा कोरोना झाल्याचे सिद्ध झाले. त्याला प्राणवायूचा पुरवठा करावा लागला. मात्र, यातूनही तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. दुसऱ्यांदा कोरोना झालेले रुग्ण बेल्जियम, नेदरलँड, हाँगकाँग आणि इक्वेडोरमध्ये आढळल्याचे अहवाल आहेत. मात्र, अनेक वेळा लक्षणे दिसून येत नसल्याने यापेक्षाही अधिक रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा



from News Story Feeds https://ift.tt/3lWppt1
via IFTTT

No comments:

Post a Comment