'महाराष्ट्राला बदनाम करणारे हाथरसच्या खड्ड्यात पडले' - Maharashtra Mazaa

Latest

Monday, October 5, 2020

'महाराष्ट्राला बदनाम करणारे हाथरसच्या खड्ड्यात पडले'

https://ift.tt/36BMtIM
मुंबई: 'हाथरसमधील सामूहिक बलात्कार व खून प्रकरणामुळं अनेक ढोंगी बुवा व ढोंगी बायांचे मुखवटे गळून पडले आहेत. सुशांतप्रकरणी जे लोक महाराष्ट्राला बदनाम करायला गेले ते स्वतःच हाथरसच्या खड्ड्यात पडले,' अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे. () हाथरस घटनेच्या विरोधात देशभरात संताप असताना उत्तर प्रदेशातील भाजपच्या मंडळींकडून आरोपींच्या समर्थनार्थ मेळावे घेतले जात असल्याचा आरोप शिवसेनेनं ''च्या अग्रलेखातून केला आहे. 'कथुआपासून उन्नाव आणि हाथरसपर्यंत हेच घडत आले आहे. प्रत्येक प्रकरणात आरोपींना पाठिंबा देण्याची दडपशाही केली गेली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांची डोकी फोडायची ही कसली लोकशाही? आरोपींच्या समर्थनार्थ मेळावे घेण्याचे कृत्य लाजिरवाणे आणि किळसवाणे आहे. अशा किळसवाण्या मेळाव्यांत मुंबईत अन्याय, अत्याचार वगैरेंविरुद्ध लढणाऱ्या नट्यांनी घुसून जाब विचारायला हवा. मुंबईत एक भूमिका व उत्तर प्रदेशात वेगळी भूमिका हे बरोबर नाही. ‘हाथरस’ प्रकरणी मुख्यमंत्री योगी यांना घेरण्याचे कारस्थान त्यांच्याच पक्षात चालू आहे काय?,' असा संशयही शिवसेनेनं व्यक्त केला आहे. वाचा: केंद्र सरकारवरही शिवसेनेनं टीकेची तोफ डागली आहे. 'मुंबईतल्या एका नटीस केंद्र सरकार वाय प्लस सुरक्षा देते, पण हाथरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबास ‘भगवान भरोसे’ सोडले जाते हे काही समान न्यायाचे तत्त्व नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेला साजेसा हा न्याय नाही. याप्रकरणी अन्यायाचा स्फोट झाला तर दलित समाज संतापून रस्त्यावर उतरेल याचे भान ठेवले पाहिजे,' असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. 'हाथरस, खैरलांजी, बलरामपूरसारखी प्रकरणे मानवतेला कलंक आहेत. एका विकृत मानसिकतेतून ती घडत असतात. त्या विकृतीचे राजकारण करणारेही समाजाचे शत्रू ठरतात. सरकारने पहिल्या दिवसापासून लपवाछपवी केली नसती तर वातावरण इतके चिघळले नसते,' असं मतही शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Sxgr8B
via IFTTT

No comments:

Post a Comment