वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांना अजूनही कोरोना संसर्ग असेल तर दुसऱ्या वादविवाद सत्रात सहभागी होण्यास आपला विरोध असेल असे डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दुसरे सत्र 15 ऑक्टोबर रोजी मायामीमध्ये होणार आहे. त्यानंतर अखेरचे तिसरे सत्र 22 ऑक्टोबर रोजी नॅशव्हील (टेनेसी) येथे असेल. ट्रम्प यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे शुक्रवारी वॉल्टर रीड लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चारच दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मोटारीतून बाहेर पडत चाहत्यांना अभिवादन करणे, व्हाइट हाउसमध्ये बाल्कनीत उभे राहून मास्क काढणे अशा त्यांची कृती वादग्रस्त ठरल्या.
जगात दीड अब्ज लोकं जातील दारिद्र्य रेषेखाली; भारतात असेल गंभीर परिस्थिती
बायडेन म्हणाले की, ट्रम्प यांना संसर्ग असेल तर वादविवाद आयोजीत होऊ नये. बऱ्याच लोकांना संसर्ग होत आहे. ही समस्या अत्यंत गंभीर आहे. क्लिव्हलँड क्लिनीकचे दिशानिर्देश माझ्यासमोर असतील. डॉक्टरांच्या मते काय करणे बरोबर आहे त्यानुसार पालन करावे लागेल. ट्रम्प यांनी वादविवादास उत्सुक असून हे सत्र विलक्षण असेल असे ट्वीट केले आहे.
इमॅन्यूअल शार्पेंची, जेनफिर डाउडना यांना रसायन शास्त्रातील नोबेल
अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रकृतीचे एकूण चित्र कसे नाही हे मला नेमके माहीत नाही. वादविवादास उत्सुक आहे, पण सर्व वैद्यकीय शिष्टाचारांचे पालन होईल इतकीच आशा आहे.
- ज्यो बायडेन
Edited By - Prashant Patil
from News Story Feeds https://ift.tt/30LMJRT
via IFTTT


No comments:
Post a Comment