पुणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट; अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची धांदल - Maharashtra Mazaa

Latest

Tuesday, October 13, 2020

पुणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट; अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची धांदल

https://ift.tt/eA8V8J

पुणे - ढगांच्या गडगडाटासह कोसळणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी रोजच्या रोज पुण्याला झोडपत आहे. शहरासह परिसरात दुपारी अचानक पडलेल्या पावसाच्या मोठ्या सरींनी पुणेकरांची धांदल उडवली. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 15) पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडा वाढला होता. हवेतील आद्रतेचे प्रमाण 95 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले होते. त्यामुळे दुपारी तीन वाजता पावसाची मोठी सर शहरात पडली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची धांदल उडाली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांमध्ये शिवाजीनगर येथील वेधशाळेत 16.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे पावसाचा जोर सर्वाधिक होता. तेथे 24.8 मिलिमीटर पाऊस पडला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट 
मध्य महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटकला हवामान खात्याने बुधवारी (ता. 14) मुसळधार पावसाचा "रेड अलर्ट' दिला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असेही सांगितले आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमीदाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तसेच, समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यताही खात्यातर्फे वर्तविली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परतीच्या पावसाचा धुमाकूळ 
परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस होत असल्याने ओढ्यांचे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील कोयना, मराठवाड्यातील निम्न दुधना धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे नदीला पूर आला आहे. 



from News Story Feeds https://ift.tt/2GZjVhY
via IFTTT

No comments:

Post a Comment