पायल घोषविरोधात रिचा चड्ढा झाली आक्रमक : अब्रुनुकसानीचा ठोकला दावा - Maharashtra Mazaa

Latest

Monday, October 5, 2020

पायल घोषविरोधात रिचा चड्ढा झाली आक्रमक : अब्रुनुकसानीचा ठोकला दावा

https://ift.tt/eA8V8J

मुंबई -बॉलीवूडमधील वेगवेगळे वाद दररोज सोशल माध्यमातून समोर येत आहेत. सुरुवातीला सुशांतसिंगच्या मृत्युविषयी अनेक कलाकार आवाज उठवताना दिसत होते. त्यानंतर बॉलीवूडमधल्या काही दिग्दर्शकांवर मी टू चे आरोप करण्यास सुरुवात झाली. त्यातून प्रख्यात कलाकारांची नावे समोर आली आहेत. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने बलात्काराचा आरोप केला होता. यावर आता अभिनेत्री पायल घोष हिच्याविरोधात अभिनेत्री रिचा चड्ढा हिने उच्च न्यायालयात धाव घेत अब्रुनुकसानीचा दावा करत पायलला आव्हान दिले आहे.

 पायल घोष हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आणि अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला. तिची आणि अनुराग याची मैत्री फेसबुकवर झाल्याचं तिनं सांगितलं. त्यानंतर ती अनुराग याला भेटली. तिसऱ्या भेटीत अनुरागने तिला घरी बोलावलं आणि यावेळी त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे तिनं म्हटलं होतं. यानंतर तिनं केलेल्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी अनुराग विरोधात बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम ३७६, ३५४, ३४१ आणि ३४२ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला.

जेव्हा आमिर खान घरी येऊन रडायचा, सिनेमे हातात असुनही संपत होतं करिअर

२०१३ मध्ये पायलनं अनुरागनं आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. मात्र या काळात अनुराग एका कामासाठी महिनाभर श्रीलंकेत होता. यासंदर्भातील कागदपत्रे देखील पुरावे म्हणून उपलब्ध असल्याचं अनुरागच्या वकिलांनी म्हटलं आहे. लैंगिक शोषण करण्याच्या आरोपावरुन अनुराग कश्यपची वर्सोवा पोलिसांनी आठ तास चौकशी केली. अभिनेत्री पायल घोष हिच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अनुरागला देण्यात आले होते. व्यावसायिकदृष्ट्या संबंध येत असल्यानं पायलशी परिचय आहे. मात्र बऱ्याच दिवसांपासून तिला कधी भेटलो नाही, तसंच फोनही केला नाही, असंही अनुरागनं जबाबात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

गायिका नेहा कक्करच्या लग्नाची पुन्हा चर्चा, पंजाबी गायकासोबत करणार लग्न?

अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच पायल आणि इतरांना खोटी वक्तव्ये करण्यापासून रोखण्याचा अंतरिम दिलासा देण्याची मागणीही केली आहे. पायलने आपल्याबाबतीत केलेली वक्तव्ये खोटीआणि बदनामी करणारी असल्याचा आरोप रिचाने याचिकेद्वारे केला आहे. रिचाने पायलसोबत अभिनेता कमाल आर. खान यालाही प्रतिवादी केले आहे. 

 



from News Story Feeds https://ift.tt/36AySl7
via IFTTT

No comments:

Post a Comment