वॉशिंग्टन डी. सी- अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या तोंडावर कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या ट्र्म्प यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. उपचारादरम्यान त्यांना कोणती औषधे दिली याबद्दल सगळ्यांना कूतुहल असेल, त्याचाही उलघडा झालेला आहे.
CNBCच्या एका रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्र्म्प यांना ऍंटीबॉडी कॉकटेल ड्रग दिलं आहे. त्यांचं नाव 'REGN-COV2' आहे. ट्र्म्प यांना या औषधाचा 8 ग्रॅमचा एक डोस दिला आहे. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु असताना त्यांच्या रक्तातील ऑक्सीजनचं प्रमाण दोन वेळेस कमी झालं होत, अशी माहिती ट्र्म्प यांच्या मेडिकल टिमने दिली आहे. पण सध्या ट्र्म्प यांची तब्येत स्थिर असून शुक्रवारी रात्रीपासून त्यांना ताप आला नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना रेमडेसिवीरचा दुसरा डोस; प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली माहिती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेडिकल टीमने सांगितले आहे की, ट्र्म्प यांनी रेमडेसिवीरचाही दुसरा डोस पूर्ण केला आहे. तसेच ट्र्म्प यांची मूत्रपिंड आणि यकृत चांगली काम करत आहेत. रॉयटर्सच्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्र्म्प यांना सोमवारी डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
पंतप्रधान मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात नेपाळमध्ये गुप्त बैठक?
राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या मते, (National Institutes of Health) रेमडेसिवीर ज्या कोरोना रुग्णांना दिलं जात आहे ते सरासरी 11 दिवसांत बरे होत आहेत. या औषधामुळे कोरोना रुग्ण सरासरीच्या चार दिवस अगोदर बरे होत आहेत. एफडीएने गिलियड साइंसेज इंक (Gilead Sciences Inc) द्वारे विकले जात असलेले हे ऍंटीव्हायरल आपतकालीन काळात वापरण्यास परवानगी दिली आहे.
from News Story Feeds https://ift.tt/3cWYDgJ
via IFTTT


No comments:
Post a Comment