औरंगाबाद : कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना कुठेही नोकरी करण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे येत्या काळात नोकरी एसटीची आणि चाकरी मात्र दुसऱ्याची अशी वेळ येण्याची शक्यता आहे. म्हणूनच कामगार संघटनांनी मात्र याला विरोध दर्शवला आहे. कोरोनामुळे एसटी महामंडळ अडचणीत सापडले आहे. राज्यभरात महामंडळाच्या ३१ विभागात एकूण १८ हजार ५०० बस एसटीच्या ताफ्यात आहेत.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
साडेतीन हजार कोटीचा फटका
कोरोनापूर्वी एसटीचे दररोजचे २२ कोटींचे उत्पन्न होते. मात्र, मार्च महिन्यात लॉकडाऊननंतर राज्यातील एसटीची सेवा पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे मार्चनंतर कोरोना काळातील १५३ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये सुमारे ३,३६६ कोटींचे एसटीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर राज्यात २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. मात्र, एरवी रोज ६६ लाख प्रवाशांना सेवा देणारी एसटी सध्या फक्त ३.८ लाख प्रवाशांची वाहतूक करत आहे. त्यामूळे एसटीला रोज अजुनही वीस कोटींचा फटका बसत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अशी असेल योजना
एसटीच्या सेवेत असताना एसटी कर्मचाऱ्यांना अन्य खासगी कंपनीत वा उद्योगधंद्याच्या ठिकाणी कमीत कमी सहा महिने किंवा जास्तीत जास्त पाच वर्षे नोकरी करता येईल. त्यासाठी एसटी महामंडळाकडून विना वेतन असाधारण रजा मंजुर केली जाईल. नोकरी आवडल्यास कर्मचारी एसटीतील नोकरीचा राजीनामा देऊ शकतो. राजीनाम्यानंतर त्याला एसटी महामंडळाकडून भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युएटी इत्यादी भत्तेही मिळतील.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
एक वर्ष सेवा असेल पात्र
एसटीत एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेवेत असलेला कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरणार असल्याचे सांगण्यात आले. खासगी कंपनीतील नोकरी न आवडल्यास एसटीत पुन्हा रुजू होता येणार आहे. एसटीमध्ये त्या कर्मचाऱ्यांची पुर्वी जेवढी वर्ष सेवा झाली होती, तोच कालावधी ग्राह्य धरुन कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेला सुरुवात करता येईल.
कर्मचारी कपातीचे धोरण
एसटीकडून खर्च कपातीचे धोरण अवलंबवण्यात आले असून त्याचाच भाग म्हणून ही योजना आणली जाणार आहे. वेतनावरील भार कमी करण्यासाठी याआधी स्वेच्छानिवृत्ती योजनेला महामंडळाकडून मंजुरी देण्यात आली होती. मात्र या दोन्ही योजनांना एसटी कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
महामंडळाचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताचा नाही. मुळात एसटीच्या सेवेत असताना अन्य ठिकाणी नोकरी करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे या निर्णयाला इंटकचा विरोध आहे. ही योजना राबवू देणार नाही.
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
(संपादन-प्रताप अवचार)
from News Story Feeds https://ift.tt/2SLIelU
via IFTTT


No comments:
Post a Comment