म. टा. प्रतिनिधी, जळगाव: राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असताना गेल्या चार दिवसांपासून मुंबईत असलेले भाजपचे माजीमंत्री हे जळगावात परतले आहेत. ते रविवारी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत काही पत्ते उघडतील, अशी शक्यता वर्तवली जात असताना त्यांनी मात्र, या विषयावर बोलणे टाळत मौन बाळगले. दरम्यान, जिल्ह्यातील जामनेर येथे विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही याबाबत एकनाथ खडसे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथे असलेले एकनाथ खडसे हे शनिवारी रात्री उशिरा जळगावात परतले. त्यानंतर रविवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेबाबत बोलण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. यावेळी काही मुद्द्यांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. माजीमंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे सुरू केलेल्या रुग्णालयाच्या उदघाटन सोहळ्याचा कार्यक्रम १३ ऑक्टोबर रोजी होणार असून, या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. एकीकडे गेल्या महिन्यात एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचे नाव घेत थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घडामोडीत गेल्या चार दिवसांपासून खडसे हे मुंबई येथे होते. यादरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली. त्यामुळे मंगळवारी जामनेर येथे फडणवीस यांना एकनाथ खडसे हे भाजपचे नेते म्हणून भेटतील की तोपर्यंत राष्ट्रवादी मध्ये जातील, अशीही उत्सुकता निर्माण झाली. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपल्याला निमंत्रण पत्रिका आहे की नाही हे पहावे लागेल, असे खडसे यांनी शनिवारी सांगितले होते. त्यानंतर रविवारी याविषयी त्यांना विचारले असता 'सर्वच आता सांगून टाकले तर कसे चालेल, उत्सुकता राहू द्या', असे सांगितले. त्यामुळे एका दिवसावर आलेल्या या कार्यक्रमास खडसे उपस्थित राहणार की नाही, याबाबत सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर उघडपणे जाईन मुंबई येथे शरद पवार यांच्या भेटीबाबतच्या चर्चेबद्दल विचारले असता खडसे म्हणाले, मी राष्ट्रवादीत जाईल तर उघडपणे जाईल. लपून-छपून जाणार नाही. मी काही चुकीचे काम केलेले नाही, असेही खडसेंनी यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना स्पष्ट केले
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jS18mW
via IFTTT


No comments:
Post a Comment