नवी दिल्ली: भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा काही प्रमाणात कमी होत असला तरी काही राज्यात बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. देशात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि दिल्लीत कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही. ज्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे तिथे टेस्टची संख्याही कमी झाल्याचे दिसले आहे.
देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा दर 10 टक्क्यांच्या खाली असून तो 8.28 टक्के एवढा आहे. तर काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात हे प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची सगळ्यात वाईट स्थिती असून तिथं हा दर 21.50 टक्के एवढे आहे. म्हणजे 100 लोकांनी कोरोना टेस्ट केली असेल तर त्यातील जवळपास 22 लोकांना कोरोना झाल्याचं आढळलं आहे. महाराष्ट्रासोबत आंध्रप्रदेश (12.90), कर्नाटक (12.21) या राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे.
India's Positivity Rate is steadily maintained below 10%. Cumulative is 8.28% and the daily figure is 7.52%.
Several States/UT are exhibiting Positivity Rate higher than the national average indicating a need for aggressive and widespread testing. pic.twitter.com/yDCIc8bxuO
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 6, 2020
नोबेल पुरस्काराचा मान यंदा तीन संशोधकांना संयुक्तरित्या मिळाला
मागील 24 तासांत देशात कोरोनाने 884 रुग्णांचा मृत्यू झाला असून 61 हजार 267 रुग्णांचं निदान झालं आहे. देशात आतापर्यंतची कोरोना बाधितांची संख्या 66 लाख 85 हजार 83 वर गेली आहे. तर सध्या 9 लाख 19 हजार 23 कोरोना रुग्ण उपचार घेत असून 1 लाख 3 हजार 569 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India reports a spike of 61,267 new #COVID19 cases & 884 deaths in the last 24 hours.
Total case tally stands at 66,85,083 including 9,19,023 active cases, 56,62,491 cured/discharged/migrated cases & 1,03,569 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/coF70IhRHt
— ANI (@ANI) October 6, 2020
सध्या देशात प्रतिदिन 10 लाख लोकसंख्येमागे 140 कोरोना चाचण्या होत आहेत. ही चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) सांगितलेल्या प्रतिदिन चाचण्यांपेक्षा 6 पटीने जास्त आहे. विषेश म्हणजे काही राज्यात देशातील सरासरीपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.
सोमवारी एका दिवसात देशात कोरोनाच्या 10 लाख 89 हजार 403 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात 8 कोटी 10 लाख 71 हजार 797 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे .
10,89,403 samples tested for #COVID19 on 5th October. Total of 8,10,71,797 samples tested in the country up to 5th October: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/OOs6un6qOq
— ANI (@ANI) October 6, 2020
महाराष्ट्रात मागील 24 तासांत कोरोनाचे 10 हजार 224 नवीन रुग्ण आढळले असून 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी दिलासादायक आहे. कारण मागील काही दिवसांत कोरोनाचे राज्यात प्रतिदिन रुग्ण जवळपास 15-20 हजारांदरम्यान वाढत होते. सध्या राज्यात 2 लाख 52 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्यात आतापर्यंत 38 हजार 347 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू मुंबईत झाला आहे.
(edited by- pramod sarawale)
from News Story Feeds https://ift.tt/3iBlnDY
via IFTTT


No comments:
Post a Comment