धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी; शिवसेनेच्या महिला खासदार भडकल्या - Maharashtra Mazaa

Latest

Saturday, October 10, 2020

धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी; शिवसेनेच्या महिला खासदार भडकल्या

https://ift.tt/3jL16xq
मुंबईः कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात १० धावांनी पराभव झाला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीही या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यानंतर सोशल मीडियावरून धोनीवर टीका होऊ लागली. यातच काही विकृत नेटकऱ्यांनी चक्क धोनीच्या ६ वर्षीय मुलीला बलात्काराची धमकी दिल्यासा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरानंतर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यंदाच्या आयपीएलच्या सामन्यात फारशी समाधानकारक कामगिरी करु शकला नाही. त्यामुळं धोनीवर सातत्याने टीका होत आहे. परंतु, काहींनी धोनीची लेक हिच्यावरही बलात्काराची धमकी दिली आहे. या घटनेवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे तर ट्रोलर्सची चांगलीच कानउघडणी केली आहे. सोशल मीडियाचा वापर किती चुकीच्या पद्धतीनं केला जातो याचं हे किळसवाणं उदाहरण आहे. या वृतीच्या लोकांकडे दुर्लक्ष केलं तर आपण अशा विकृत मानसिकतेच्या लोकांनी जे स्त्रियांबद्दल वाईट विचार करतात त्यांच्या वागणूकीला खतपाणी घालतोय, असं ट्विट प्रियांका चतुर्वेदी यांनी केलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dmDsVC
via IFTTT

No comments:

Post a Comment