सोलापूर : कोरोना महामारीचे संकट दूर करण्याच्या हेतूने आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शिक्षकांची मदत घेतली जात आहे. मात्र, आरोग्याचा प्रश्न, कौटुंबिक अडचणी पुढे करुन अनेकजण ड्यूटी नाकारत आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसेल अथवा कौटुंबिक अडचण असल्याने संबंधित शिक्षक त्या काळात विद्यार्थ्यांसाठी तथा शाळेसाठी काहीच करु शकणार नाही. त्यामुळे संबंधितांची प्रकृती चांगली होईपर्यंत बिनपगारी रजेवर पाठविण्याचे नवे आदेश शासनाने दिले आहेत.
सोलापूरसह अन्य शहरांमधील कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा या हेतूने माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीम राबविली जात आहे. तर को- मॉर्बिड रुग्णांवर वॉच ठेवला जात आहे. सोलापूर महापालिका क्षेत्रातील साडेतीन हजारांहून अधिक शिक्षकांपैकी दीड हजार शिक्षकांनी आतापर्यंत कोरोना ड्यूटी केली आहे. त्यापैकी काहींना दुसऱ्यांदा ड्यूटी करावी लागली. तर काहींना एकदाही ड्यूटी आलेली नाही. त्यामुळे सर्व शिक्षकांना समान काम मिळावे, ठरावीक शिक्षकांवरच अन्याय होऊ नये म्हणून महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी संपूर्ण नियोजनाची जबाबदारी प्रशासन अधिकारी कादर शेख यांच्यावर सोपविली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत 30 दिवसांची ड्यूटी पूर्ण केलेल्या शिक्षकांना आता कार्यमुक्त केले जाणार आहे. पुढील टप्प्यात ज्या शिक्षकांना ड्यूटी दिलेली नाही, त्यांना आता ड्यूटी दिली जाणार आहे. सरकारी आदेशानुसार आरोग्यासह अन्य कारणे पुढे करुन ड्यूटी नाकारणाऱ्यांना आता सक्तीच्या रजेवर पाठविले जाईल, असेही आयुक्तांनी त्यांच्या निर्णयात नमूद केले आहे.
को-मॉर्बिड अन् माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेनंतरही घेतली जाईल मदत
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत को-मॉर्बिड व्यक्तींचा सर्व्हेसह अन्य कामांसाठी शिक्षकांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकांना किमान 30 दिवसांची ड्यूटी करावीच लागेल. कौटुंबिक तथा आरोग्यासंबंधीचे कारण पुढे करुन ड्यूटी रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांना आता सक्तीच्या रजेवर पाठविले जाणार आहे.
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त, सोलापूर
निर्णयातील अशा असतील अटी...
- कोरोना ड्यूटी नकोय तर बिनपगारी रजा घेऊन घरी बसा
- ड्यूटी रद्दसाठी थेट नको तर मुख्याध्यापकांच्या माध्यमातून करावेत अर्ज
- ड्यूटी जॉईन केल्याचा दाखला घेऊन तीन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांना भेटणे आवश्यक
- कोरोना हद्दपार होईपर्यंत शिक्षकांना टप्प्याटप्प्याने 30 दिवसांची ड्यूटी करावीच लागणार
- ड्यूटी रद्द करण्यापूर्वी कामावर हजर राहणे बंधनकारक; संबंधित नागरी आरोग्य केंद्राचा दाखला घ्यावा
from News Story Feeds https://ift.tt/2SLmx5t
via IFTTT


No comments:
Post a Comment