नवी दिल्ली - प्रवासी रेल्वेगाड्यांचा वेग वाढविण्यासाठी संपूर्णपणे भारतात तयार झालेली दोन इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिने वाहतुकीसाठी सज्ज झाली आहेत. प्रती तास १६० किलोमीटर इतक्या वेगाने रेल्वे गाडी खेचण्याची क्षमता असलेल्या व मेक इन इंडिया योजनेअंतर्गत तयार केलेल्या या इंजिनांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. यातील एक इंजिन नवी दिल्ली- मुंबई राजधानी एक्स्प्रेसला जोडण्यात येणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. ही नवीन स्वदेशी इंजिने प्रचंड मोठा आवाज न करणारी, प्रदूषणमुक्त व पर्यावरणास अनुकूल असतील असे तंत्रज्ञांनी म्हटले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (सीएलडब्ल्यू) कारखान्यातील तंत्रज्ञांनी ‘एयरोडायनेमिक डिझाइन’च्या ‘व्हीएपी -५’ चा वापर करून या दोन्ही इलेक्ट्रिक इंजिनांची निर्मिती केली आहे. त्यांना ३५०१२ व ३५०१३ (मेक इन इंडिया) असे क्रमांक देण्यात आले आहेत. रेल्वेने आज दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकी ६००० अश्वशक्तीच्या या इंजिनांमध्ये प्रती तास १६० किलोमीटर इतक्या वेगाने धावतानाही येणारे तांत्रिक अडथळे (एअर ड्रॅग्रज) कमी करता येतील, अशी रचना करण्यात आली आहे.
हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणार- योगी आदित्यनाथ
प्रदूषण टाळता येणार
ही इंजिने संपूर्णपणे विजेवर धावणारी असल्याने त्यामुळे प्रदूषणही टाळता येणार आहे. दोन्ही इंजिनांत आयजीबीटी आधारित पर्पल्सन यंत्रणाही बसविण्यात आली आहे. पहिल्या दोन्ही स्वदेशी इंजिनांचा उपयोग दिल्ली-मुंबई व दिल्ली-कोलकाता या मार्गांवरील प्रिमिअम प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी करण्यात येणार आहे.
Bihar Election: पहिल्याच घासाला खडा; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत मोडली आघाडी
कंपोझिट कन्व्हर्टरची सोय
दिल्ली ते मुंबई व दिल्ली ते कोलकता या दोन्ही मार्गांवर फक्त मालवाहतुकीसाठीच्याडीएफसी कॉरिडॉरचे कामही प्रगतीपथावर असून तो २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यामुळे प्रवासी गाड्यांना होणारा विलंब टळेल अशी आशा रेल्वेला आहे. या गाड्यांचे डबे व पेन्ट्री कारमधील वीजपुरवठा व वातानुकूलन यंत्रणेत व्यत्यय येऊ नये यासाठी इंजिनांमध्ये कंपोझिट कन्व्हर्टरची रचना करण्यात आली आहे.
Edited By - Prashant Patil
from News Story Feeds https://ift.tt/3l967QA
via IFTTT


No comments:
Post a Comment