ट्रम्प यांनी कोरोनामध्ये साधली संधी; विरोधकांना दिला धक्का - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, October 4, 2020

ट्रम्प यांनी कोरोनामध्ये साधली संधी; विरोधकांना दिला धक्का

https://ift.tt/eA8V8J

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर वॉल्टर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका अवघ्या महिन्याभराने पार पडणार असून त्यातच ट्रम्प यांना कोरोना झाल्यानं प्रचारात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यातही संधी साधून ट्रम्प यांनी विरोधकांना धक्का दिला आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवाही पसरल्या आहेत. वेळोवेळी ट्रम्प यांनी व्हिडिओ शेअर करून प्रकृतीची माहिती दिली आहे. तसंच समर्थकांचे आणि हितचिंतकांचे आभारही मानले आहेत. 

ट्रम्प यांना रुग्णालयातून सोमवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यात म्हटलं की, ट्रम्प यांची प्रकृती वेगाने दुशारत आहे. शुक्रवारी सकाळपासून त्यांना ताप आलेला नाही. तसंच रक्तातील ऑक्सिजनची पातळीसुद्धा वाढत आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी अचानक रुग्णालयातून बाहेर येत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

रविवारी सांयकाळच्या सुमारास अचानक ट्रम्प रुग्णालयातून बाहेर आले. रुग्णालयाबाहेर आधीपासूनच त्यांचे समर्थक होते त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. याबाबत व्हाइट हाऊसने म्हटलं की, ट्रम्प सांयकाळी साडेपाचच्या सुमारास वॉल्टर रीड रुग्णालयातून बाहेर आले. कारमध्ये बसून ते समर्थकांमध्ये गेले. काही वेळाने ते पुन्हा रुग्णालयात परतले. 

ट्रम्प यांनी रुग्णालयातून एक व्हिडिओ जारी करून आपण बाहेर येणार असल्याचं सांगितलं होतं. ट्रम्प म्हणाले की,'मी कोरोनाबद्दल खूप काही शिकलो. प्रत्यक्षात कोरोनाच्या शाळेत जाऊन शिकलो. ही वास्तवातली शाळा आहे.' रुग्णालयातून बाहेर येण्यावर अनेक डॉक्टरांनी टीकेची झोड उठवली आहे. कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य अद्याप ट्रम्प यांना नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.

हे वाचा - ट्र्म्पना दिलं जातंय 'स्पेशल औषध'; अजुन इतरांसाठी नाही उपलब्ध

जॉर्ज वॉशिंग्टन रुग्णालयातील डॉक्टर जेम्स फिलिप म्हणाले की, राष्ट्राध्यक्षांची एसयुव्ही फक्त बुलेटप्रूफ नाही तर केमिकल हल्ल्यापासून सुरक्षित आहे. या कारमध्ये कोरोनाच्या संक्रमणाचा धोका सर्वाधिक असून त्यांचा हा बेजबाबदारपणा धक्कादायक आहे.



from News Story Feeds https://ift.tt/2GqHvE3
via IFTTT

No comments:

Post a Comment