वॉशिंग्टन : कोरोनाचा कहर जगभरात झाला असून याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. दरम्यान, अमेरिकेत एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. रुग्णालयात कोरोनाची चाचणी करायला गेलेल्या महिलेचा जीव धोक्यात सापडला होता. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करून तिचे प्राण वाचवले.
कोरोना महामारीचा गेल्या सात-आठ महिन्यांपासून जगभरात कहर सुरु आहे. संपूर्ण जग सध्या या कोरोनावरील लस बनवण्याच्या मागे आहे. सध्या एकही लस अस्तित्वात नसल्याने जगभरात अजूनही कोरोनाच्या भीतीचे सावट गडद आहे. आणि म्हणूनच लोक थोडीजरी शंका आली तरी कोरोनाची टेस्ट करायला हॉस्पिटलकडे धाव घेत आहेत. मात्र, कोरोनाची टेस्टदेखील थोडी वेदनादायी असते. कोरोनाची टेस्ट दोनप्रकारे होते. एक म्हणजे नेजल स्वॅब टेस्ट आणि दुसरा आहे थ्रोट स्वॅब टेस्ट. यातील नेजल स्वॅब टेस्ट ही प्रक्रिया फारच कष्टदायी असते.
हेही वाचा - मास्क लावून डोनाल्ड ट्रम्प रुग्णालयात दाखल, VIDEO शेअर करून दिली माहिती
अमेरिकेच्या आयोवा हॉस्पिटलमध्ये एक महिला कोरोनाची टेस्ट करायला लॅबमध्ये गेली होती. मात्र, टेस्ट करणे तिला महागात पडलं असतं. स्वॅब टेस्ट करताना तिच्या जीवालाच धोका निर्माण झाला होता. टेस्टवेळी तिच्या मेंदूतील नस फुटली. यामुळे तीची अवस्था बिकट झाली. डॉक्टरांनी वेळीच तिच्यावर उपचार केल्यानं धोका टळला.
महिलेच्या नाकातून आला मेंदूतील द्रव पदार्थ
एका मेडीकल जर्नलशी बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसच्या नेजल स्वॅब टेस्टदरम्यान त्या महिलेच्या मेंदूतील नस फुटली आणि त्यांच्या मेंदूतील द्रव पदार्थ बाहेर यायला लागला. ही गोष्ट त्या महिलेच्या जीवावर बेतू शकत होती. मेंदूतील नस फुटल्याने त्यांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला होता. रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, 40 वर्षाच्या या महिलेला आधीपासूनच इंटरक्रेनियल हायपरटेंशनचा त्रास असून त्यावर उपचार सुरु आहेत.समस्या होत्या ज्याबद्दाल तिने माहिती दिली नव्हती आणि टेस्ट करतानासुद्धा चूक झाली त्यामुळे ही दुर्घटना घडली.
हेही वाचा - एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल; त्याची काय चूक...
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, महिला इलेक्टीव्ह हर्निया सर्जरीच्या आधी नेजल टेस्ट करायला गेली होती. टेस्टच्या दरम्यान महिलेच्या नाकातून एक द्रव पदार्थ बाहेर येताना दिसला. यानंतर महिलेला डोकेदुखी, उलट्या, गळ्यात अडकल्यासारखं वाटणं, डोळ्यांवर अंधारी येणं अशा काही समस्या येऊ लागल्या. या महिलेने सांगितले की,'याआधी देखील एक स्वॅब टेस्ट झाली होती. तेव्हा कसलीही समस्या आली नव्हती. मात्र, आताची टेस्ट योग्यरित्या न झाल्याने हे घडलं असावं.'
from News Story Feeds https://ift.tt/3nd6AmG
via IFTTT


No comments:
Post a Comment