वॉशिंग्टन डी. सी- अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनावर उपचार करुन व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. कोरोनाचा (Coronavirus) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर चार दिवसांपुर्वी ट्रम्प (Donald Trump) यांना रुग्नालयात आणलं होतं. ट्रम्प यांनी लवकरच निवडणुक प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याची आशा व्यक्त केली आहे. यापुर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी रुग्नालयातून सोमवारी सायंकाळी डिस्चार्ज मिळेल असं ट्वीट करुन सांगितलं होतं. ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतताच त्यांनी मास्क काढून प्रतिक्रिया दिली होती. मास्क काढून प्रतिक्रिया दिल्याने सोशल मिडियावर ट्रम्प यांच्यावर मोठी टीका होत आहे.
'मी लवकरच निवडणुकांचा प्रचार पुन्हा सुरु करणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूकांच्या फेक न्यूज फेक पोल दाखवत आहेत.' असं ट्विट राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मागील 72 तासांत ताप आला नसून त्यांच्या शरीरातील ऑक्सीजनची लेवलही सामान्य असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Will be back on the Campaign Trail soon!!! The Fake News only shows the Fake Polls.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 5, 2020
पंतप्रधान मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात नेपाळमध्ये गुप्त बैठक?
राष्ट्रपती ट्रम्प यांच्या प्रकृतीत सुधार आला असून ते लवकरच घरी जातील. अजून राष्ट्रपती पूर्णपणे ठीक झाले नाहीत पण ते घरी जाण्यासाठी सुरक्षित आहेत. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्यासाठी 24 तास मेडिकल टीम काळजी घेईल, असं व्हाईट हाऊसचे प्रमुख डॉक्टर सीने कॉनले यांनी सांगितले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांना रेमडेसिवीरचा दुसरा डोस; प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली माहिती
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 5, 2020
CNBCच्या एका रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्र्म्प यांना उपचारादरम्यान ऍंटीबॉडी कॉकटेल ड्रग दिलं होतं. त्यांच नाव 'REGN-COV2' आहे. ट्र्म्प यांना या औषधाचा 8 ग्रॅमचा एक डोस दिला होता. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं दिसलं होतं. राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु असताना त्यांच्या रक्तातील ऑक्सीजनचं प्रमाण दोन वेळेस कमी झालं होतं, अशी माहिती ट्र्म्प यांच्या मेडिकल टिमने दिली आहे.
from News Story Feeds https://ift.tt/34wVZKC
via IFTTT


No comments:
Post a Comment