पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांची संख्या वाढू लागल्यामुळे पीएमपी प्रशासनाने तीन दिवसांमध्ये सुमारे 100 जादा बस रस्त्यावर आणल्या आहेत. तसेच, पीएमपी सुमारे दोन लाख प्रवाशांचा टप्पा सोमवारी ओलांडेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
कोरोनाचा लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर दोन्ही महापालिकांनी पीएमपीची वाहतूक 3 सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली. तेव्हा पीएमपीच्या सुमारे 421 बस मार्गांवर धावत होत्या. आता त्यांची संख्या सुमारे 550 झाली आहे. शहरातील दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिल्यामुळेही प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी नोंदविले. जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधीलही दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. त्यामुळे वाघोले, तळेगाव दाभाडे, तळेगाव ढमढेरे, राजगुरुनगर, सासवड, उरुळी कांचन आदी भागांतील प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. प्रत्येक बसमध्ये क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेण्यात येत आहेत. परिणामी, प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे जादा बस रस्त्यावर आणण्याची गरज भासू लागली. पीएमपीच्या संचालक मंडळाने त्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार गुरुवारपासून टप्प्याटप्प्याने 100 जादा बस रस्त्यावर आणल्या आहेत. तसेच भोसरी, कात्रज, हडपसर, निगडी, कोथरूड, सिंहगड रस्ता, अप्पर इंदिरानगर, धनकवडी, विश्रांतवाडी आदी मार्गांवरही प्रवासी संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे नव्या बस या मार्गावर सोडल्या आहेत. तसेच, 50 बस अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहेत. अशा एकूण 600 बस रस्त्यावर धावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांची संख्या वाढते. 17 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव, 24 ऑक्टोबरला दसरा तर 14 नोव्हेंबरपासून दिवाळी आहे. त्यामुळे सोमवारपासून प्रवाशांची संख्या आणखीन वाढेल, असा अंदाज आहे. त्यानुसार देखभाल-दुरुस्ती करून जादा बस तयार ठेवण्यात येत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
1 लाख 84 हजार - सध्याची दररोजची प्रवासी संख्या
30 लाख - पीएमपीचे दररोजचे उत्पन्न
550 - मार्गावरील एकूण बस
50 - अत्यावश्यक सेवेसाठी बस
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महापालिकांनी द्यावा निधी
संचलनातील तुटीपोटी पुणे महापालिकेकडून 110 कोटी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 74 कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी पीएमपीने केली आहे. त्यासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची सोमवारी भेट घेऊन निधीसाठी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.
देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
स्थायी समितीची आर्थिक कोंडी
बस सुरू राहण्यासाठी पीएमपीला 110 कोटी रुपयांची गरज आहे. तर, चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाच्या भूसंपादनासाठी 50 कोटी उपलब्ध व्हावेत, अशी "विनंती' भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेला केला आहे. शहरातील विकासकामे सुरू व्हावीत, अशी नगरसेवकांची मागणी आहे. महापालिकेने पाच ठिकाणी पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली आहे. परिणामी, पालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल घटला आहे. परिणामी, स्थायी समितीची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे स्थायीचा प्राधान्यक्रम आता कसे असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
from News Story Feeds https://ift.tt/2GTudA7
via IFTTT


No comments:
Post a Comment