महात्मा फुले जनआरोग्य योजना कोणासाठी? सोलापूर जिल्ह्यातील 2100 रुग्णांनाच मिळाला लाभ - Maharashtra Mazaa

Latest

Tuesday, October 13, 2020

महात्मा फुले जनआरोग्य योजना कोणासाठी? सोलापूर जिल्ह्यातील 2100 रुग्णांनाच मिळाला लाभ

https://ift.tt/eA8V8J

सोलापूर : सोलापूर शहर- जिल्ह्यात आतापर्यंत 37 हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून त्यातील एक हजार 296 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना काळात सर्वच रुग्णांना महात्मा फुले व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार देण्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार 81 रुग्णांनाच आतापर्यंत या योजनेतून मोफत उपचार मिळाले आहेत. उर्वरित रुग्णांपैकी काहींना पदरमोड करावी लागल्याची चर्चा त्यांच्या नातेवाईक करू लागले आहेत.

राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप दूर झालेले नाही. राज्यभरात दररोज सरासरी 10 ते 13 हजार रुग्णांची भर पडू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयानुसार 31 ऑक्‍टोबरपर्यंत सर्वच रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत. मात्र, बहुतांश रुग्णांना या योजनेबद्दल माहितीच नाही. तर काही रुग्णांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर काही दिवसांनी योजनेबद्दल माहिती झाल्याने त्यांना लाभ घेता आलेला नाही. आतापर्यंत शहर-जिल्ह्यातील 20 रुग्णालयांमधून दोन हजार 81 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 13 कोटी 70 लाख 51 हजार 700 रुपयांचा लाभ मिळाला आहे. आता या बिलांचे लेखापरीक्षण सुरू करण्यात आले आहे.

मोफत उपचाराचे हॉस्पिटलनिहाय लाभार्थी
यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर (105), जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी (51), श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर (500), अश्‍विनी सहकारी रुग्णालय सोलापूर (105), अश्‍विनी ग्रामीण मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कुंभारी (168), श्री मार्कंडेय रुग्णालय, सोलापूर (343), चंदन न्यूरो सायन्स सेंटर,(सीएनएस) सोलापूर (73), धनराज गिरजी हॉस्पिटल, सोलापूर (68), गंगामाई हॉस्पिटल, सोलापूर (97), लोकमंगल जीवक हॉस्पिटल, सोलापूर (19), अकलूज क्रिटिकल केअर ऍण्ड ट्रामा सेंटर (52), कदम मल्टीस्पेशलिस्ट, अकलूज (97), देवडीकर हॉस्पिटल, अकलूज (55), मोनार्क हॉस्पिटल, सोलापूर (14), सुश्रुत हॉस्पिटल, बार्शी (48), जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर (48), पंढरपूर सुपरस्पेशालिस्ट गॅलेक्‍सी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल (54), श्री गणपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर (88), लाईफ- लाईन सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, पंढरपूर (72), आणि उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर (25). 

सोलापूर शहर-जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी
शहर- जिल्ह्यातील 20 रुग्णालयांमध्ये ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दोन हजार 81 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या संख्येत सोलापूर अव्वल आहे. ज्या रुग्णांना ऑक्‍सिजन तथा व्हेंटिलेटरची गरज लागते, त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर या योजनेतून मोफत उपचार केले जात आहेत. 
- डॉ. दीपक वाघमारे, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना, सोलापूर

शहर-जिल्ह्याची कोरोनाची स्थिती

  • शहरातील एकूण रुग्ण
  • 9,107
  • एकूण मृत्यू
  • 507
  • ग्रामीणमधील एकूण रुग्ण
  • 28,255
  • एकूण मृत्यू
  • 789
  • "जनआरोग्य'चा लाभ
  • 2,081


from News Story Feeds https://ift.tt/3755JPs
via IFTTT

No comments:

Post a Comment