नवी दिल्ली: भारतीय औषध नियंत्रक विभागाने (DCGI) मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीची थांबवण्यात आलेली चाचणी पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीतील परीक्षण रोखण्याचा आदेशही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) रद्द केला आहे.
बिहारच्या विकासात भाजपही वाटेकरी; नितीश यांना श्रेय न जाऊ देण्याची खबरदारी
क्लिनिकल चाचणीसंदर्भात अतिरिक्त लक्ष ठेवण्याव्यतिरिक्त अन्य काही नियमाचे पालन करण्याच्या सूचनाही सीरम इन्स्टिट्यूटला देण्यात आल्या आहेत. विपरित परिणाम दिसल्यास नियमानुसार उपाययोजनांची माहिती ठेवावी, असेही भारतीय औषध नियंत्रक विभागाने (DCGI) ने म्हटले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
11 सप्टेंबर रोजी डीसीजीआयने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या क्लिनिकल ट्रायलला स्थगिती दिली होती. ऑक्सफर्डच्या साथीने ऍस्ट्राझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करणार असलेल्या लशीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या जगभरात चालू आहेत. इंग्लंडमधील स्वयंसेवकावर विपरीत परिणाम जाणवू लागल्याने चाचण्या स्थगित करण्यात आल्या होत्या. फक्त इंग्लंडच नव्हे तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्येही चाचण्यांना स्थगिती दिली होती.
from News Story Feeds https://ift.tt/32wJLlv
via IFTTT


No comments:
Post a Comment