''CM उद्धव ठाकरेंसह शिवसैनिकांना अयोध्येत विरोधाचा सामना करावा लागेल" - Maharashtra Mazaa

Latest

Friday, September 11, 2020

''CM उद्धव ठाकरेंसह शिवसैनिकांना अयोध्येत विरोधाचा सामना करावा लागेल"

https://ift.tt/eA8V8J

अयोध्या : बॉलिवूडमधील राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील विरोधी पक्षानंतर आता अयोध्येतील संतांनी आता कंगनाची बाजू घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांना अयोध्येचा दौरा करु देणार नाही, असा पवित्रा संतांनी आणि विश्व हिंदू परिषदेने घेतला आहे.

'कंगना रनौत बनणार महाराष्ट्राची आगामी मुख्यमंत्री?' वाचा असं कोण म्हणालंय

रामजन्मभूमीत उद्धव ठाकरेंच स्वागत होणार नाही तर त्यांना विरोधाचा सामना करावा लागेल, अशी भूमिका संतांनी घेतली आहे. अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष  महंत नरेंद्र गिरी यांनी कंगना राणावत हिचा देशाची मुलगी असल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, असे म्हटले आहे.  हनुमान गढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी देखील मुंबईतील कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईवर आक्षेप नोंदवला आहे. याप्रकरणानंतर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला अयोध्येत आल्यानंतर विरोधाचा सामना करावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही'; कंगनाला शिवसेना नेत्याने मारला टोला

कंगना राणावतने बॉलिवूड माफिया आणि ड्रग्ज माफियांविरोधात हिंमत दाखवली आहे. तिच्या धाडसामुळे त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या भूमिकेमुळे सरकारचाही थरकाप उडाला आहे, अशी प्रतिक्रिया महंत गिरी यांनी दिली आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या काळात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असा आरोप करत सर्व साधू संत आणि देश कंगनाच्या बाजूनं उभा आहे, असे महंत नरेंद्र गिरी यांनी म्हटले आहे.   



from News Story Feeds https://ift.tt/33n4Z4v
via IFTTT

No comments:

Post a Comment