नवी दिल्ली - जगाच्या आर्थिक नाड्या आवळणाऱ्या कोरोनाने अनेकांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असून यंदा मे ते ऑगस्ट या काळामध्ये तब्बल ६६ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, यामध्ये डॉक्टर, अभियंते आणि शिक्षक यांचा समावेश आहे. रोजगारामध्ये झालेली ही २०१६ नंतरची निचांकी घसरण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मागील चार ते पाच वर्षांमध्ये लाखो औद्योगिक कामगारांनी मेहनत करून मिळवलेले यश कोरोनामुळे मातीमोल झाले आहे. ‘‘ दि सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) ने सादर केलेल्या आकडेवारीतून ही बाब उघड झाली आहे. ‘सीएमआयई’कडून दर चार महिन्याला रोजगाराची स्थिती मांडणारा अहवाल सादर करण्यात येतो. कोरोनाचा जबरदस्त तडाखा हा नियमित वेतन घेणाऱ्या पांढरपेशा नोकरदारांना अधिक बसल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान आज देशभर बेरोजगारीच्या मुद्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलन केले. एकीकडे भाजपचे कार्यकर्ते विविध उपक्रमांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत असताना सोशल मीडियावर मात्र #NationalUnemploymentDay हा ट्रेंड चर्चेत होता.
औद्योगिक क्षेत्रावर मळभ
औद्योगिक क्षेत्रामध्ये जबरदस्त वेगाने बेरोजगारी वाढल्याचे दिसून आले आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये वर्षानुवर्षे वाढ होताना दिसते. या क्षेत्रातील एकूण रोजगारामध्ये २६ टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले. लघू, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना कोरोनाचा फटका बसला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कारकुनी काम करणाऱ्यांवर परिणाम नाही
कारकुनी कामे करणाऱ्यांना या लॉकडाउनचा फारसा फटका बसला नसल्याचे दिसून आले आहे, विविध सरकारी कार्यालये आणि सचिवालयांमध्ये काम करणारे कर्मचारी, बीपीओ आणि केपीओतील काम करणारे कर्मचारी यांना याचा फारसा फटका बसलेला नाही. विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये रोजगाराच्या आघाडीवर काहीप्रमाणात सुधारणा होताना दिसते.
जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तरुणाई नाराज का?
कोरोनाच्या संकटात परीक्षा
पंचविशीतील तरुणांना काम नाही
तरुणाईच्या समस्यांवर ठोस उपाय नाही
बड्या कंपन्यांनी केलेले कॉस्ट कटिंग
औद्योगिक आणि आयटी क्षेत्राची घसरण
पांढरपेशा नोकरदार
१.८८ कोटी : मे- ऑगस्ट २०१९
१.२२ कोटी : मे-ऑगस्ट २०२०
बेरोजगारीचा दर
देश ः ७.३ टक्के
शहरी ः ८.९ टक्के
ग्रामीण ः ६.५ टक्के
देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यांना बसला फटका
सॉफ्टवेअर अभियंते, डॉक्टर, शिक्षक, लेखापाल आणि विश्लेषक अशा स्वरूपाच्या पांढरपेशा नोकरदारांना याचा जबर फटका बसला आहे. एखादी विशिष्ट संस्था आणि संघटनेमध्ये काम करणारे आणि व्यावसायिक कौशल्य आत्मसात केलेल्या मंडळींना कोरोनाने मोठा धक्का बसला आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2REqpVu
via IFTTT


No comments:
Post a Comment