भाजपची ईडी, सीबीआय, एनसीबी अन्‌ शिवसेनेचा डायरेक्ट जेसीबी; नेमकं प्रकरण काय वाचा - Maharashtra Mazaa

Latest

Saturday, September 12, 2020

भाजपची ईडी, सीबीआय, एनसीबी अन्‌ शिवसेनेचा डायरेक्ट जेसीबी; नेमकं प्रकरण काय वाचा

https://ift.tt/eA8V8J

अहमदनगर : राज्यात गेल्यावर्षी विधानसभा निवडणूका झाल्या. त्यात राष्ट्रवादी व कॉग्रेस एकत्रीत तर भाजप व शिवसेना हे एकत्रित लढले होते. निकालानंतर मुख्यमंत्रीपदवारुन भाजप व शिवसेना यांची युती तुटली. अन्‌ कोणी कल्पनाही केलेली नसताना भाजपला विरोधी बाकावर बसवत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले. त्यानंतर हे सरकार फक्त काही दिवस राहिल असा कयास बांधला जात होता. मात्र, अजूनतरी सरकारला काही धोका नसल्याचे सांगितले जात आहे.

सरकार स्थापन झाल्यांनंतर कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला. त्याला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यातच सरकारचा सर्वाधिक काळ गेला आहे. त्यातच आता अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या व कंगणा राणावत प्रकरण मोठ्याप्रमाणात चर्चेत आहे. याकडे इतर राज्यांचेही लक्ष लागलेले आहे. त्यात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यामुळे राजकारणही तापले आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. त्याला सरकार पक्षाचे नेतेही उत्तरे देत आहेत. त्यात नेटेझिन्सही आपली मते व्यक्त करत आहेत. त्यातच सध्या एक मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात म्हटल आहे की,

सरकार बद्दल पोस्ट करतांना आपल घर अतिक्रमणमध्ये तर नाही ना... याची खात्री करुन घ्या..
भाजप : ED, CBI, NCB...!

शिवसेना : डायरेक्ट JCB...

असा भाजप आणि महाविकास आघाडी सरकारची तुलना करणारा विनोदी मेसेज व्हायरल होत आहे. अभिनेत्री कंगना राणावत यांच्या अनाधिकृत बांधकामावर मुंबई बृहमुंबई महापालिकेनी दोन दिवसांपूर्वी कारवाई केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत होती. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा त्यांच्यावर ईडी, सीबीआय व एसीबीच्या कारवाईचा इशारा नेण्यात येत असल्याचा आरोप केला जात होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ईडीची नोटीस आली होती. तेव्हा ईडीने चौकशीसाठी बोलावण्याच्या आधीच शरद पवार ईडीच्या कार्यालयात गेले होते. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे राज ठाकरे यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यातूनच आता कंगना राणावत प्रकरणानंतर शिवसेना डायरेक्टर जेसीबीच दाखवत असल्याचा आरोप केला जात आहे.



from News Story Feeds https://ift.tt/2DRko4i
via IFTTT

No comments:

Post a Comment