नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील तपासात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येत आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असलेल्या या प्रकरणाचे पडसाद लोकसभेत उमटल्याचे पाहायला मिळाले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भोजपूरी अभिनेता आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनसंदर्भातील मुद्यावर भाष्य केले.
NEET Exam: 700 किमी प्रवास केला पण 10 मिनिटं उशीर झाल्यानं वर्ष गेलं वाया
Drug addiction is in film industry too. Several people have been apprehended, NCB is doing very good work. I urge central govt to take strict action, apprehend the culprits soon, give them befitting punishment & bring an end to conspiracy of neighbouring countries: Ravi Kishan https://t.co/5oUiQLxiHu
— ANI (@ANI) September 14, 2020
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजावेळी रवी किशन म्हणाले की, ड्रग्ज तस्करी आणि ते सेवन करण्याची युवा पीढीला लागणारी सवय हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. तरुणाईला भरकटवण्यासाठी चीन आणि पाकिस्तान देशात ड्रग्ज पुरवण्याचं काम करतात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पंजाब आणि नेपाळमधून ड्रग्ज देशभरात पोहचवण्याचे काम सुरु आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. ड्रग्जचं कनेक्शन बॉलिवूडमध्येही आहे. याप्रकरणात एनसीबीचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. दोषींना पकडून कठोरात कठोर कारवाई करत पाक-चीनचा कट उधळून लावायला हवा, अशा आशयाचे वक्तव्य रवी किशन यांनी म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणातील तपासादरम्यान बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि मिरिंडाला एनसीबीने अटक केली होती. रियाने तपासादरम्यान बॉलिवूडमधील अन्य काहींची नावे देखील सांगितली आहेत. या प्रकरणात बॉलिवूडमधील दिग्गजांची नावे असल्याची चर्चा आहे. याप्रकणाचे पडसाद लोकसभेत उमटल्याचे पाहायला मिळाले.
from News Story Feeds https://ift.tt/3mmjSww
via IFTTT


No comments:
Post a Comment